Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»मुक्ताईनगर»मुक्ताईनगर न.प.प्रशासनाचा गटारींच्या निकृष्ट कामाला ‘ग्रीन सिग्नल’
    मुक्ताईनगर

    मुक्ताईनगर न.प.प्रशासनाचा गटारींच्या निकृष्ट कामाला ‘ग्रीन सिग्नल’

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoMay 28, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी

    शहरात न.प. हद्दीत डॉ.गिरीश पाटील यांच्या घरापासून ते बोदवड रोडपर्यंत लाखो रुपयांचे गटारीचे काम हे अंदाजपत्रकाला तिलांजली देऊन सुरू आहे. पर्यवेक्षक अधिकाऱ्यांकडून आर्थिक हितसंबंधापोटी संबंधित ठेकेदाराच्या मनमानी कारभाराला अर्थपूर्ण पाठिंबा असल्याची चर्चा शहरात असल्याचा आरोप बहुजन मुक्ती पार्टीचे राज्य संघटक प्रमोद सौंदळे यांनी पत्रकार परिषदेद्वारे केला आहे.

    अंदाजपत्रकानुसार गटारीचे खोदकाम केल्यानंतर पिचिंग केल्यानंतरच त्यावर स्टील टाकून काँक्रिटीकरण करणे बंधनकारक होते. परंतु संबंधित ठेकेदाराने अंदाजपत्रकाला केराची टोपली दाखवत डायरेक्ट काड्या मातीवरच काँक्रीट टाकलेले आहे. त्यामुळे भविष्यात नैसर्गिक तत्त्वानुसार काळी माती दबून निकृष्ट काँक्रीटमध्ये तळे जाऊन काँक्रीटमधून पाणी जमिनीत पाझरून संपूर्ण गटारीचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु या निकृष्ट कामाबद्दल न.प. प्रशासनाने अंदाजपत्रकात सोलिंग पिचिंग दिलेले नसल्याचे त्रयस्थ व्यक्तीमार्फत सांगण्यात येत आले. त्यामुळे नगरपंचायतच्या नफा फंडातून शहराच्या विकासासाठी दिलेल्या निधीतून संबंधित पर्यवेक्षक अधिकारी व ठेकेदार यांचाच विकास होत आहे की काय? असा प्रश्‍न परिसरातील नागरिक विचारात आहे.

    नगरपंचायत प्रशासनाच्या आर्थिक पाठिंब्यामुळे ठेकेदार एवढ्यावरच थांबलेला नाही निकृष्ट कामांमध्ये वापरण्यात येणारे स्टील ही अंदाजपत्रकानुसार नाही. त्यांची करण्यात येणारी बांधी ही लांब लांब अंतरावर घेतलेली आहे. तसेच सुरू असलेल्या काँक्रीटच्या कामावर एवढ्या उष्ण तापमानात आजतागायत एकदाही पाणी मारण्यात आलेले नाही. यावरून एकंदरीतच मुक्ताईनगर नगरपंचायतच्या नफा फंडातून काढण्यात येणारी गटारी जनतेच्या सोयीसाठी नसून पर्यवेक्षक अधिकारी व ठेकेदारासाठी असल्याचे एकंदरीत सिद्ध होत असल्याचा आरोप बहुजन मुक्ती पार्टीचे राज्य संघटक प्रमोद सौंदळे यांनी पत्रकार परिषदेद्वारे केला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Muktainagar : भरधाव इनोवाची दुचाकीला समोरासमोर धडक

    February 13, 2026

    Muktainagar : मुक्ताईनगर शेतकऱ्यांचा महामार्गावर उग्र रस्ता रोको आंदोलन

    February 3, 2026

    Muktainagar : प्रसादेश्वर शिवमंदिरातील चोरीप्रकरणी पोलिस निष्काळजीपणाने ग्रामस्थांमध्ये रोष

    February 1, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.