साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील वाघळी शिवारात विठ्ठल सुदाम बोरकर (रा.जामधरी, ता.नांदगाव) यांच्या मालकीच्या मेंढ्या वाघळी शिवारात चारण्यासाठी आल्या होत्या. उष्माघातामुळे २५ मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मेंढपाळाचे २ ते ३ लाखांचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे मेंढपाळाचे अश्रू अनावर झाले होते.
घटनास्थळी भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष पोपट भोळे, मल्हार सेनेचे नाशिक विभागीय अध्यक्ष गणेश जाने यांनी भेट दिली. शासनाकडून मेंढपाळांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे.