Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»महाबळला वीज महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण
    क्राईम

    महाबळला वीज महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoMay 23, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, जळगाव : प्रतिनिधी

    शहरातील वीज महावितरण कंपनीचे गिरणा पंपिंग सबस्टेशन अंतर्गत महाबळ येथील कार्यालयात कामावर हजर असलेल्या कर्मचाऱ्याला विद्युत पुरवठा खंडित केल्याच्या कारणावरून हरीविठ्ठल नगरातील एकाने बेदम मारहाण करून कार्यालयावर दगडफेक केल्याची घटना बुधवारी, २२ मे रोजी रात्री १२.४५ मिनिटांनी घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

    जळगाव शहरातील गिरणा पंपिंग रस्त्यावरील महावितरण कंपनीचे सबस्टेशनच्या अंतर्गत महाबळ येथे कार्यालय आहे. या ठिकाणाहून खंडेराव नगर, हरीविठ्ठल नगर, वाघ नगर, रामानंदनगर, समता नगर येथे विद्युतपुरवठा करण्याचे काम केले जाते. २२ मे रोजी रात्री १२.४५ वाजता हरीविठ्ठल नगरमध्ये राहणारा दीपक सपकाळे यांच्यासह एक जण असे दोन जण महाबळ कार्यालयात येथे आले. त्याठिकाणी कर्मचारी किरण दत्तात्रय सपकाळे (रा. दादावाडी) हे कामावर हजर होते. दरम्यान, दीपक सपकाळे हा तेथे येऊन कर्मचारी किरण सपकाळे यांना लाईट चालू, बंद का करतो? असे बोलून कार्यालयात ओढून बेदम मारहाण केली. तसेच कार्यालयाच्या बाहेर येऊन दोघांनी कार्यालयावर दगडफेक करुन निघून गेले.

    ही घटना घडल्यानंतर सकाळी ११ वाजता महावितरण कंपनीच्या विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. सायंकाळी मारहाण करणाऱ्या विरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Bhusawal : भुसावळ आंबेडकर नगरात जुन्या वादातून तरूणावर मारहाण

    March 4, 2026

    Jalgaon : जळगाव पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंद मुलीचा शोध सुरू

    March 4, 2026

    Jalgaon : मेहरूणमध्ये जुन्या वादातून तुफान हाणामारी दोन जखमी

    March 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.