Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»मुक्ताईनगर»हरताळे पाझर तलावातील नियमबाह्य उत्खननाकडे जिल्ह्यासह तालुका प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष
    मुक्ताईनगर

    हरताळे पाझर तलावातील नियमबाह्य उत्खननाकडे जिल्ह्यासह तालुका प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoMay 22, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी

    तालुक्यातील हरताळे येथील ब्रिटिशकालीन पाझर तलावातून बोदवड परिसर उपसा सिंचन योजनेची कामे नियमबाह्य पद्धतीने रात्रंदिवस २४ तास गौण खनिज उत्खनन सुरू आहे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे सर्रास उल्लंघन परवानाधारकांकडून होत असल्याच्या निषेधार्थ तलाव क्षेत्रात बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे युवा तालुकाध्यक्ष अमोल बोदडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिलेला आहे.

    तालुक्यातील हरताळे येथील ब्रिटिश कालीन पाझर तलावातून बोदवड परिसर उपसा सिंचन योजनेचे कामे गौण खनिज उत्खनन हे फक्त धरणांच्या कामासाठी देण्यात आलेले आहे. वाहनधारकांकडून इतरत्र गौण खनिज विक्री होत आहे. खनकाम सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत करण्याचे आदेश असूनही गौण खनिज उत्खनन रात्रभर सुरूच आहे. गौण खनिज महा खनिज प्रणालीद्वारे निर्गमित केलेल्या वाहतूक पास व ईटीपीशिवाय इतरही विनापरवाना वाहनांद्वारे गौण खनिज वाहतूक केली जात आहे. परवाना आदेशानुसार गौण खनिज सांडू नये किंवा उडू नये, यासाठी वाहनांवर ताडपत्रीने किंवा योग्य अशा इतर साधनाने झाकून गौण खनिजाची वाहतूक करण्याचे आदेश असूनही परवानाधारकांकडून आदेशानुसार गौण खनिज न झाकल्यामुळे शेतकरी तसेच नागरिकांना या खनिजामुळे प्रचंड प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.

    जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार परवानाधारकाने प्रत्येक आठवड्यास दर सोमवारी खनिज वाहतुकीचा अहवाल तहसील कार्यालयात बिनचूक पाठविणे क्रमप्राप्त असताना परवानाधारकांकडून कोणताही अहवाल आजतागायत तालुका प्रशासनाकडे सादर केलेला नसल्याचे तालुका प्रशासनाने तोंडी स्वरूपात सांगितले आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे उल्लंघन करून गौण खनिज वाहतूक करणाऱ्या बोदवड उपसा सिंचन योजनेच्या ठेकेदारावर तात्काळ कठोरात कठोर कार्यवाही न झाल्यास वंचित बहुजन आघाडीच्यावतीने तलाव क्षेत्रात बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे देण्यात आलेला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Muktainagar : भरधाव इनोवाची दुचाकीला समोरासमोर धडक

    February 13, 2026

    Muktainagar : मुक्ताईनगर शेतकऱ्यांचा महामार्गावर उग्र रस्ता रोको आंदोलन

    February 3, 2026

    Muktainagar : प्रसादेश्वर शिवमंदिरातील चोरीप्रकरणी पोलिस निष्काळजीपणाने ग्रामस्थांमध्ये रोष

    February 1, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.