साईमत, पहुर, ता.जामनेर : वार्ताहर
खरीप हंगामात शेतकऱ्यांना सहज कपाशी बियाणे उपलब्ध व्हावे, यासाठी पहूर येथील कृषी निविष्ठा असोसिएशनने बैठक घेतली. या दरम्यान चढ्या भावाचे बियाणे खरेदी न करण्याचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांनी एकाच वाणाचा आग्रह धरू नये, असे बैठकीतून आव्हान केले आहे. तसेच जामनेर तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे.
पहूर येथील माजी जिल्हा परिषद कृषी सभापती तथा कृषी केंद्र संघटना प्रदीप लोढा यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या कार्यालयात कृषीनिविष्ठा विक्रेत्यांची नुकतीच बैठक घेण्यात आली. त्यात खरीप हंगामात येणाऱ्या अडचणी, याचबरोबर संबंधित घाऊक विक्रेत्यांकडून किरकोळ निविष्ठा धारकांना कृत्रिम टंचाई भासविण्याचा प्रयत्न केला जात असल्याने चढ्या दराने बियाणे खरेदीसाठी वेठीस धरले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होऊ नये, याकरिता स्थानिक कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी चढ्या दराचे बियाणे खरेदी न करण्याचा सर्वानुमते निर्णय घेऊन चढ्या दराने शेतकऱ्यांना बियाणे विक्री न करण्याचा निर्णय शेतकरी हितासाठी घेतल्याचे निविष्ठा विक्रेत्यांनी घेतला आहे. याचबरोबर सर्वानुमते ठराव मंजूर केला आहे.
कंपन्याकडे माल वितरणाचे नियोजन आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी एकाच वाणाचा आग्रह धरू नये. यासाठी सर्व शेतकऱ्यांनी विक्रेत्यांना सहकार्य करण्याची भूमिका घ्यावी, असे माजी जिल्हा परिषद कृषी सभापती प्रदीप लोढा यांनी सांगितले आहे.
यावेळी उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रल्हाद पाटील, सुरेश गांजरे, अरुण पाटील, प्रकाश पाटील, ज्ञानेश्वर पवार, विजय लोढा, प्रशांत बेदमुथा, रवींद्र बनक, युवराज जाधव, संतोष झवर, सुनील तवर, प्रणय देशमुख, अनिल खाकरे, सुनील कुमावत, राहूल आस्कर, नितीन पाटील, गजानन पाटील, रमेश पाटील, मनोज जोशी, दीपक लोढा यांच्यासह पंचवीस बियाणे विक्रेते उपस्थित होते.