साईमत, फैजपूर : प्रतिनिधी
अनेक प्रकारच्या नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीमुळे मानवी जीवन दिवसेंदिवस असुरक्षित होत चालले आहे. काही आपत्ती टाळता येत नाहीत. त्यांना धैर्याने तोंड द्यावे लागते. पण अनेक आपत्ती आपल्या क्षुल्लक चुकांमुळे आपण ओढवून घेतो. त्या आपण विज्ञानाच्या आधारे टाळू शकतो. म्हणूनच आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत एल.पी.जी. गॅस सुरक्षा अभियानानिमित्त येथील जे.टी.महाजन इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये नुकतेच घरगुती एल.पी.जी. गॅसचे धोके व उपाययोजना विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाचे आयोजन दास ग्रुप ऑफ कंपनी, सूर्या एलपीजी गॅस सुरक्षा विभाग, रावेर यांच्यावतीने केले होते.
कंपनीच्यावतीने शुभम लाड, रवी खांजोडे, असिस्टंट मॅनेजर, सूर्या एलपीजी गॅस व दास ग्रुप ऑफ कंपनी आणी विठ्ठल पाटील यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखविले. त्यात प्रामुख्याने एलपीजी म्हणजे काय? गॅसच्या दुर्घटना का घडतात? गॅसची सुरक्षा कशी घ्याल, विज्ञानाने केलेली प्रगती तसेच सिलेंडर आग व धोका नियंत्रण व्यवस्थापन याविषयी सविस्तरपणे मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ.आर.डी.पाटील, प्र.प्राचार्य डॉ.के.जी.पाटील, उपप्राचार्य डॉ.जी.ई.चौधरी, डॉ.पी.एम महाजन, सर्व विभाग प्रमुख डॉ.ए.एम.पाटील, डॉ.डी.ए.वारके, प्रा. एल.डी.चौधरी, प्रा. वाय.आर.भोळे, प्रा.मोहिनी चौधरी उपस्थित होते.