Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»जामनेर»समाज घडविण्यासाठी बालमनावर संस्कार होणे गरजेचे
    जामनेर

    समाज घडविण्यासाठी बालमनावर संस्कार होणे गरजेचे

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoMay 10, 2024Updated:May 10, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, पहुर, ता. जामनेर : वार्ताहर

    सुदृढ, सशक्त आणि प्रामाणिक समाज घडविण्यासाठी बालमनावर संस्कार होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन ह.भ.प. ज्ञानेश्‍वर महाराज यांनी केले. श्री संत सावता महाराज अध्यात्मिक बाल संस्कार शिबिराच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते. सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक सुदाम चौधरी यांच्या फार्म हाऊस येथे ह.भ.प. ज्ञानेश्‍वर महाराज बोरसे यांच्या प्रेरणेने गेल्या वर्षापासून बालसंस्कार शिबिर आयोजित केले जात आहे. यंदा शिबिरात ५५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. क्रांतीसूर्य फाउंडेशनतर्फे सर्व सहभागी बाल वारकऱ्यांना तसेच अन्नदात्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

    दुसरीत शिकणाऱ्या हर्षल प्रविण घोंगडे या चिमुकल्याची हनुमान चालीसा तर ओम गणेश महाजन (जरंडी) या ९ वर्षांच्या चिमुकल्याचे विष्णूसहस्त्रनाम मुखोद्गत आहे. त्यांच्या सादरीकरणाबद्दल रोख बक्षीस देवून गौरविण्यात आले. शिबिरात मुख्य प्रशिक्षक म्हणून ह.भ.प. मयूर महाराज (जरंडी, ता. सोयगाव) यांचे मार्गदर्शन लाभले. नागेश्‍वर साखरे यांनी शिबिरार्थींना योगाचे धडे दिले. ह.भ.प. मुकूंदा महाराज, ह.भ.प. कन्हैय्या महाराज, समर्थ विठ्ठल मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष विठ्ठल बाबा राऊत, समाधान कचरे आदींचे मार्गदर्शन लाभले.

    शिबिरात मृदंग वादन, टाळ-विना वादन, हरिपाठ, हनुमान चालीसा, विष्णुसहस्रनाम, भगवद्गीतेतील श्‍लोक पठण, पसायदान आदी अध्यात्मिक शिक्षणाचा सहभागींनी लाभ घेतला. बालकवयित्री ज्ञानेश्‍वरी भामेरे स्मृती प्रित्यर्थ ज्ञानवेद प्रबोधिनीतर्फे सर्व बालवारकऱ्यांना हरिपाठ पोथीचे वितरण करण्यात आले.

    क्रांतीसूर्य फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक जाधव यांच्या प्रेरणेने उपाध्यक्ष विकास उबाळे, सचिव भागवत सोनवणे, ज्ञानेश्‍वर चौथे, अनिल घोंगडे, सुनील पांडव, गजानन सोनवणे यांनी सहभागी बालवारकरी व अन्नदात्यांचा सन्मानपत्र देवून गौरव केला. विकास बनकर, सुनील बनकर यांनी जलसेवा दिली. यावेळी ह.भ.प. प्रकाश महाराज, विजय बनकर, सुभाष कचरे, प्रदीप साखरे, बाळू सुरडकर, योगेश कचरे, विलास लहासे, पवन हिवाळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. सुत्रसंचालन शंकर भामेरे तर दीपक जाधव यांनी आभार मानले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Paladhi Taluka Jamner:जळगावचा तरुण चेन्नई समुद्रात बेपत्ता; कुटुंबात शोककळा

    February 23, 2026

    Jamner : जामनेरमध्ये एकाला चौघांकडून बेदम मारहाण

    February 13, 2026

    Bhusawal-Jamner : भुसावळ-जामनेर परिसरात धाडसी कारवाई; चोरीच्या तीन मोटारसायकलींसह दोन तरुण गजाआड

    January 30, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.