साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील देवगाव देवळी येथील महात्मा जोतीराव हायस्कुलमध्ये मानव विकास कार्यक्रम २०२३-२४ अंतर्गत गरजू, पात्र लाभार्थी मुलींना सायकलीचे नुकतेच वाटप करण्यात आले. इयत्ता आठवीतील विद्यार्थिनी कोमल संजय जाधव, कांचन संजय जाधव, निशा दिलीप जाधव, उज्ज्वला रोहीदास पावरा, भारती बन्सिलाल पावरा या पात्र मुलींना शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन, शिक्षक आय.आर.महाजन, एस.के.महाजन, एच.ओ.माळी, अरविंद सोनटक्के, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक यांच्या उपस्थितीत सायकलींचे वाटप करण्यात आले.