कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे मतदानासाठी दिली शपथ

0
76

साईमत, जळगाव : प्रतिनिधी

येथील कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे बुधवारी, १ मे रोजी के.बी.एस. समाजमंदिरात कंजरभाट समाजातील झालेल्या विवाहात समाजबांधवांना मतदान करण्यासाठी शपथ देण्यात आली. जळगाव जिल्हा प्रशासनाला कंजरभाट समाज युवा फाऊंडेशन संस्थेनेही मतदान जनजागृतीसाठी हातभार लावला आहे. याबद्दल त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

आम्हीही स्वतः लोकशाहीचा घटक आहोत. मतदान हा लोकशाहीचा आधारस्तंभ आहे. मतदान हा तुमचा अधिकारच नाही तर तुमची जबाबदारी आहे, असे संस्थेचे सचिव राहुल नेतलेकर यांनी सांगितले. यावेळी नरेश बागडे यांनी उपस्थित सर्वांना मतदान करण्यासाठी शपथ दिली.

याप्रसंगी मोहन गारुंगे, विजय अभंगे, शशिकांत बागडे, सचिन बाटूंगे, योगेश बागडे, संदीप गारुंगे, प्रदीप नेतले, पंकज गागडे, निखिल गारुंगे, संदीप बागडे, संतोष रायचंदे, गौतम बागडे, क्रांती बाटूंगे, अभय गारुंगे, अविनाश अभंगे, कार्तिक बाटूंगे, जयेश माछरे, राहुल दहियेकर, गोपाल बाटूंगे, बिरजू नेतलेकर, ज्ञानेश्‍वर गुमाने, मनोहर अभियेकर, अशोक इंद्रेकर, मनोज माछरे, मोडकलाल तमायचे तसेच जळगाव, धुळे, नंदुरबार, दोंडाईचा, अमळनेर, नाशिक, संगमनेर येथील समाजबांधव, महिलांसह इतर समाजबांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here