Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»जामनेर»जामनेर तालुक्यात आशा सेविका, अंगणवाडी सेविका वाढविणार मतदानाचा टक्का
    जामनेर

    जामनेर तालुक्यात आशा सेविका, अंगणवाडी सेविका वाढविणार मतदानाचा टक्का

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoApril 30, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, जामनेर : प्रतिनिधी

    जिल्हाधिकारी आयुष प्रसाद तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, जिल्हा बालविकास प्रकल्प अधिकारी देवेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात आरोग्य विभाग व महिला बालकल्याण विभाग हे मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी कामकाज करणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर माता बाल संगोपन केंद्र व प्रथमोपचार केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. रावेर लोकसभा मतदार संघात १३ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानाच्या दिवशी तालुक्यातील गरोदर माता, स्तनदा माता, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक यांचा मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी आरोग्य विभाग व महिला बालकल्याण विभागामार्फत जनजागृती करण्यात येत आहे.

    तालुक्यातील ३२७ मतदान केंद्रावर ३९६ अंगणवाडी सेविका, २७१ आशा स्वयंसेविका तसेच १२६ आरोग्य अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून मतदानाबाबत जनजागृती करून मतदानाचा टक्का वाढविण्याचे तसेच माता बालसंगोपन केंद्र व प्रथमोपचार केंद्राचे काम करण्यात येणार आहे. आशा स्वयंसेविका व अंगणवाडी सेविका यांचे प्रशिक्षण तहसीलदार नानासाहेब आगळे, बालविकास प्रकल्प अधिकारी देवेंद्र राऊत, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे, नायब तहसीलदार चैताली दराडे यांच्याकडून नुकतेच घेण्यात आले.

    मतदान करण्यासाठी नियोजन

    याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. पल्लवी राऊत, डॉ.दानिश खान, डॉ.नरेश पाटील, बालविकास प्रकल्प अधिकारी शीला पाटील, एस.एस सोनार, भारती भिसे, निशा तेली सर्व गटप्रवर्तक, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. जामनेर तालुक्यातील शहरी भागात ८४७ तर ग्रामीण भागात पाच हजार ८७३ गरोदर मातांचे व शहरी भागात ८४८ स्तनदा माता तसेच ग्रामीण भागात पाच हजार १८४ स्तनदा मातांचे मतदान सकाळी ९ वाजेपर्यंत पूर्ण करण्याबाबत नियोजन केल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे यांनी दिली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Paladhi Taluka Jamner:जळगावचा तरुण चेन्नई समुद्रात बेपत्ता; कुटुंबात शोककळा

    February 23, 2026

    Jamner : जामनेरमध्ये एकाला चौघांकडून बेदम मारहाण

    February 13, 2026

    Bhusawal-Jamner : भुसावळ-जामनेर परिसरात धाडसी कारवाई; चोरीच्या तीन मोटारसायकलींसह दोन तरुण गजाआड

    January 30, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.