महाराष्ट्र दिनानिमित्त ब्राह्मणशेवगेतील ‘निसर्गटेकडी’ प्रकल्पावर महाश्रमदान

0
90

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील ब्राह्मणशेवगे येथील ओसाड पडीक, मुरमाड, बंजर जवळपास २५ हेक्टर क्षेत्रावर २०२१ पासून माथ्याकडील पाणलोट उपचाराबरोबरच टप्प्याटप्प्याने वृक्षारोपण करण्यात येऊन टेकड्यांच्या परिसराला ‘निसर्गटेकडी’ प्रकल्प नाव संबोधन करण्यात आले. परिसरातील झाडांना आग ओकत असलेल्या सुर्यामुळे कडक उन्हात पाणी देणे गरजेचे आहे. त्याबरोबर आळे तयार करणे, सफाई करणे, सहज जलबोध अभियानाच्या तांत्रिक मार्गदर्शनाने जलसंधारणाचे माथ्याकडील उपचार तयार करणे, यासाठी महाराष्ट्र दिनानिमित्त बुधवारी, १ मे रोजी पहाटे सहा वाजता महाश्रमदानाचे आयोजन केले आहे.

अशा आगळ्यावेगळ्या अविस्मरणीय सामाजिक व पर्यावरणीय उपक्रमाचा भाग होण्यासाठी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक सेवा सहयोग ग्रामोदय, भुजल अभियान, जलमित्र परिवार, लोकनायक तात्यासाहेब महेंद्रसिंग राजपूत प्रतिष्ठान संचलित हिरकणी महिला मंडळ, ग्रामपंचायत, ब्राह्मणशेवगे यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी सुचित्राताई पाटील ८९९९१५३८९८, शशांक अहिरे ९४२०३८२६१०, पंकज राठोड ९३७०६२८८७४, प्रवीण राठोड ७८२१९०८२६९, ज्ञानेश्‍वर राठोड ७०५७५९५५६०, संजय बाविस्कर ९९२१६३९१७०, विलास चव्हाण ९५७९३९०३७२ यांच्याशी संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here