पातोंड्यात जलसंधारण कामासंदर्भात बैठक

0
84

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

तालुक्यात सेवा सहयोग ग्रामोदय प्रकल्प, भूजल अभियान अंतर्गत जलसंधारण, पर्यावरण रक्षण, शिक्षण, आरोग्य, रोजगार आदी उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत. त्याअनुषंगाने पातोंडा येथे नाला खोलीकरण, रुंदीकरण, गाळ काढणे, बांध बंदीस्ती, शेतशिवार रस्ते करणे, पाणलोट उपचाराबरोबरच मृदसंधारण कामे करण्यासंदर्भात बैठक नुकतीच घेण्यात आली. याप्रसंगी सेवा सहयोग ग्रामोदय प्रकल्प, भुजल अभियानाच्या सुचित्रा पाटील, सोमनाथ माळी यांनी उपस्थित शेतकऱ्यांना जलसंधारण कामांबद्दल तसेच संस्थेच्या उपक्रमांची माहिती दिली.

याप्रसंगी सरपंच काशिनाथ शिरसाठ, दीपक पाटील, नितीन महाजन, सुकदेव पाटील, अनिल रोकडे, ज्ञानेश्‍वर झगडे, दीपक सरदार, आनंद पाटील, राजेंद्र पाटील, राजेंद्र जानराव, दिलीप चौधरी, सुनील चौधरी, विकास पाटील, शंकर पाटील, ज्ञानेश्‍वर पाटील, अशोक पाटील, भास्कर पाटील, गुलाब झगडे, राजेंद्र पाटील, सुभाष माळी, दत्तात्रय शिंपी, पांडुरंग माळी, रघुनाथ चौधरी, किशोर माळी, पांडुरंग माळी, बापू सावळकर, छोटू सावळकर, दिलीप पाटील, प्रकाश अमृतकर, संजय शिंपी, योगेश देशमुख, सागर देशमुख, वामन पाटील, प्रभाकर पवार, सुरेश पाटील, संजय पाटील आदी शेतकरी उपस्थित होते. सुत्रसंचालन राहुल अमृतकर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here