Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»राज्य»पायाभूत सुविधांची कामे दर्जेदार व्हावीत – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे
    राज्य

    पायाभूत सुविधांची कामे दर्जेदार व्हावीत – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

    saimat teamBy saimat teamSeptember 21, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई, वृत्तसंस्था । मुंबईत विविध यंत्रणांमार्फत सुरू असलेली विकास आणि पायाभूत सुविधांची कामे दर्जेदार आणि नियोजित वेळेत पूर्ण व्हावीत, असे निर्देश पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले.

    ना. ठाकरे यांच्या हस्ते आज वरळी परिसरातील नेहरू सायंस सेंटर जंक्शन, फिनिक्स मुंबई माईल फ्लायओव्हरखालील जागा, सेनापती बापट मार्ग, पांडुरंग बुधकर मार्ग, सायानी रोड, गोखले रोड, एनी बेझंट रोड वरील सौंदर्यीकरण आणि फुटपाथच्या कामांचे तसेच सर पोचखानवाला रोड व खान अब्दुल गफार खान रोडला जोडणाऱ्या पायवाटेच्या (हिलटॉप लेन) सौंदर्यीकरण व नूतनीकरणाच्या कामांचे भूमिपूजन झाले. या कामांना आजपासूनच सुरूवात होत आहे. यावेळी नगरसेवक स्नेहल अंबेकर, समाधान सरवणकर, माजी राज्यमंत्री सचिन अहिर, माजी आमदार सुनिल शिंदे, महापालिकेचे सहायक आयुक्त शरद उघडे आदी उपस्थित होते.

    मुंबईच्या विकासात सर्वांचा सहभाग असावा या श्री ठाकरे यांच्या आवाहनानुसार आज भूमिपूजन होत असलेली कामे राज्य शासन, मुंबई महानगरपालिका यांच्या निधीसह फिनिक्स मिल्स, आदित्य बिर्ला ग्रुप यांच्या सीएसआर निधीमधून करण्यात येणार आहेत. या कामांची पर्यावरण मंत्री श्री ठाकरे यांनी माहिती घेतली. या परिसराचे सुशोभीकरण आणि सौंदर्यीकरण करताना टाकाऊ पदार्थांपासून सुंदर कलाकृती निर्माण करून त्यांचा वापर करण्यात येणार आहे. त्यांचीही पाहणी करून श्री ठाकरे यांनी त्यांचे कौतुक केले. महानगरपालिकेचे सहायक आयुक्त शरद उघडे यांनी श्री. ठाकरे यांना येथे करण्यात येणाऱ्या कामांची माहिती दिली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Budget 2026 : अर्थसंकल्प 2026: निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा; स्वस्त काय, महाग काय?

    February 1, 2026

    Deputy Chief Minister : सुनेत्रा पवार हे महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत

    January 31, 2026

    अजित पवारांच्या पार्थिवाला मुखाग्नी; सुरक्षा रक्षक रडताना जय पवारांनी केलं सांत्वन

    January 29, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.