साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर
येथील धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटिव्ह सोसायटीद्वारा संचलित डॉ.जे.जी.पंडित माध्यमिक विद्यालयात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी पी.यु. खरे होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.यु.डी.शेळके, पर्यवेक्षक पी.एम.सुर्वे, पालकांमधून म्हसास येथील योगेश पाटील, विद्यालयातील शिक्षक उपस्थित होते.
यानंतर विद्यालयातील विद्यार्थिनी अनुजा योगेश पाटील हिने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित मनोगत व्यक्त केले. यावेळी विद्यालयातील उपशिक्षक आर.के.सुरवाडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित गीत सादर केले. विद्यालयाचे उपशिक्षक व्ही.बी.इंगळे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाविषयी उपस्थितांना माहिती दिली. याप्रसंगी पी.यु. खरे यांनी मनोगतातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले सामाजिक कार्य व संविधान याविषयी माहिती देऊन गीत सादर केले.
विद्यालयाचे पर्यवेक्षक पी.एम.सुर्वे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान व त्यांनी दिलेला मंत्र याविषयी माहिती दिली. यावेळी विद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन बी.एन.पाटील तर आर.के.खोडपे यांनी आभार मानले.