Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»रावेर»सावदा पोलीस ठाण्यात हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकत्रपणे साजरा केली ‘इफ्तार पार्टी’
    रावेर

    सावदा पोलीस ठाण्यात हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकत्रपणे साजरा केली ‘इफ्तार पार्टी’

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoApril 10, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, सावदा, ता.रावेर : वार्ताहर

    जातीय सलोखा अधिक बळकट करण्यासाठी आणि तो कायम नांदावा, या मुख्य उद्देशाने येथील पोलीस ठाण्याचे एपीआय जालिंदर पळे यांच्यावतीने पोलीस ठाण्याच्या आवारात गुढीपाडवा, रमजान ईद व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित रोजा ‘इफ्तार पार्टी’त शहरासह परिसरातील हिंदू-मुस्लिम बांधव संख्येने सहभागी झाले होते. इफ्तार पार्टीत एकत्रपणे पवित्र रमजानचा रोजा इफ्तार केला.

    कार्यक्रमाच्या माध्यमातून ‘अनेकता मे एकता यही भारत की विशेषता’ अशा ब्रिद वाक्याची खरोखरच अद्भुत व कौतुकास्पद अंमलबजावणी केली. प्रत्येक समाजाने आपापले धार्मिक व सामाजिक सण, उत्सव, कार्यक्रम कायद्याच्या चौकटीत राहून आनंदाने साजरे करावे, असे आव्हान अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी केले.

    याप्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, मुक्ताईनगरचे उपविभागीय पोलिस अधिकारी राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे, सावदाचे पीएसआय अमोल गर्जे , पीएसआय अन्वर तडवी, माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, माजी नगरसेवक फिरोज लेप्टी, रवींद्र बेंडाळे, लाला धनंजय, शिवसेना शहरप्रमुख भरत नेहेते, जितू सर लहान वाघोदा, ज्येष्ठ पत्रकार युसूफ शाह, आत्माराम तायडे, निसार अहमद, बाबू मंजूर, कलीम जनाब, नुरा खाटीक, मोठा वाघोदा येथील माजी सरपंच कालु मिस्तरी, माजी सरपंच मुबारक उर्फ राजू तडवी, रियाज मलिक, सलीम मुशिर तडवी, निसार सेठ, कलीम मेंबर चिनावल, पो.कॉ.विनोद पाटील, पो. कॉ. मजहर पठाण, गुन्हा शाखेचे संजय चौधरी, गोपनीय शाखेचे देवेंद्र पाटील, यशवंत टहाकळे, बबन तडवी, मोहसीन खान, संजय तडवी यांच्यासह शहर, परिसरातील हिंदू-मुस्लिम समाजाचे मान्यवर उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Savda, Taluka Raver: भीषण अपघात भरधाव मोटारसायकलच्या धडकेत पादचारी ठार

    February 23, 2026

    Savda : सावदात भीषण आग! पाच दुकाने जळून खाक, लाखोंचे आर्थिक नुकसान

    February 4, 2026

    Raver : रावेरजवळ समोरासमोर धडक; दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू

    February 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.