वेळेवर लग्न लावा अन्‌ पाच हजार रुपये मिळवा

0
19

साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर

‘वेळेवर लग्न लावा आणि पाच हजार रुपये मिळवा’, असा स्तुत्य उपक्रम मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आबासाहेब पाटील यांनी जामनेर तालुक्यासाठी सुरु केला आहे. अशा स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. एक लाखाचा बँड, वीस हजाराची बग्गी लावलेली आहे. परंतु तुमच्यामुळे दोन हजार लोकांना आपण चार ते पाच तास उन्हात ताटकळत ठेवणे किती योग्य आहे. इतर समाजाचा आदर्श मराठा समाजाने घेणे गरजेचे आहे. त्यामुळे ही बक्षीस योजना सुरु करीत असल्याचे आबासाहेब पाटील यांनी सांगितले. पहिल्या बक्षीसाचे मानकरी सोनाळा येथील नवदाम्पत्य ठरले. यावेळी वधू-वर, आई-वडील यांचा जाहीर सत्कार करून बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी डॉ.मनोहर पाटील, ह.भ.प.अविनाश महाराज, आबासाहेब पाटील, नवल पाटील यांच्यासह सकल मराठा समाज उपस्थित होता.

लोहारा येथे काही दिवसांपूर्वी नवीन फुट वेअर शॉपीचा शुभारंभ करण्यासाठी जामनेर तालुक्यातील कुंभारसीम गावाचे समाजसेवक तथा मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष, जिल्हाध्यक्ष उद्योजक कक्ष जळगाव आबासाहेब पाटील आले होते. तेव्हा त्यांनी माणुसकी समूहाचे गजानन क्षीरसागर यांची भेट घेऊन सामाजिक विषयावर चर्चा केली. त्यांनी लग्न वेळेवर लागत नसल्याने नाराजी व्यक्त करीत मराठा समाजाची व्यथा मांडली. तेव्हा त्यांना नवीन कल्पना सुचली असून आपल्या स्वखर्चातून वेळेवर लग्न लावा आणि पाच हजार रुपयांचे प्रेरणात्मक बक्षीस मिळवा. समाजापुढे आदर्श ठेवा, असा संदेश सोशल मीडियावर व्हायरल करून तिथेच सुरुवात केली. बोलता बोलता हा मेसेज संपूर्ण जामनेर तालुक्यातून फिरत आहे. कारण ही योजना केवळ जामनेर तालुका पुरतीच मर्यादित आहे.

काही नागरिकांनी ‘समझनेवाले को इशारा काफी है’, असे म्हणत वेळेवर लग्न लावणे सुरु केले आहे. नागरिकांना एक प्रकारे लग्नाला आलेल्या पाहुण्यांची होणारी गैरसोय तसेच जळगावचा पारा ४२च्यावर जात असल्याने वेळेवर जेवण झाल्याने तब्येत बिघडणे व नाहक महिला व वृद्धांना त्रास होत आहे. लग्न कार्यात श्रीमंतीचे प्रदर्शन करू नका, तरुणांनी मद्यधुंद अवस्थेत नाचू नका, विनाकारण आपल्या मराठा समाजाचा वेळ वाचवा, नाहीतर येणारे पाहुणे तुम्हाला आशीर्वाद न देता लग्न उशिरा लागत असल्यामुळे आहेर करून घराचा रस्ता धरतात, हे मात्र मान्य करावे लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here