Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»यावल»राजोरा फाटा ते निमगावात घडले बिबट्याचे दर्शन
    यावल

    राजोरा फाटा ते निमगावात घडले बिबट्याचे दर्शन

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoMarch 29, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, यावल : प्रतिनिधी

    मार्च महिन्यात उन्हाळ्याचे तापमान वाढल्यामुळे वन्य प्राणी पाणी पिण्यासाठी आणि थंडावा मिळण्यासाठी वाटेल तिकडे भटकंती करीत आहे. अशातच एक बिबट्या बुधवारी रोजी रात्री ग्रामस्थांना व पेट्रोलिंग करणाऱ्या एका पोलिसाला राजोरा फाटा ते निमगावात दिसून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलीस आणि वन विभागाने चुप्पी साधली आहे.

    रात्रीच्या वेळेस राजोरा गावाजवळील बाहेरील वस्तीमधील रहिवाशांना तसेच राजोरा फाटा ते निमगाव दरम्यान म्हणजे भुसावळ रस्त्यावर पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसाला बिबट्याचे दर्शन घडले असले तरी याबाबत मात्र पोलीस आणि यावल पूर्व वनक्षेत्रपाल फटांगरे यांच्या वन कर्मचाऱ्यांनी निमगाव परिसरात बिबट्याला पकडण्याचे कोणतेही साहित्य आपल्या सोबत न घेता बिबट्याची पाहणी केली. परंतु बिबट्या दिसला नाही. उन्हाळ्याचे तापमान लक्षात घेता बिबट्या परिसरात केळीच्या बागांमध्ये कुठेतरी लपून असेल असेही ग्रामस्थांमध्ये चर्चिले जात आहे. परंतु याबाबत त्यांनी नागरिकांना माहिती पडू नये म्हणून गप्प राहण्याची भूमिका घेतल्याने ग्रामस्थांमध्ये आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

    शेळगाव बॅरेजमध्ये पाणी अडविल्याने तसेच वन्यप्राणी पाणी पिण्यासाठी तसेच आपले भक्ष्य शोधण्यासाठी तसेच भुसावळ जवळील तापी नदी पूलापासून पिळोदा, अंजाळे, बोरावल, टाकरखेडा भालशीव, पिंप्री शिवारात भटकंती करण्यासाठी नैसर्गिक दऱ्या-खोऱ्यांचे तसेच बागायती पिकांचे पोषक असे वातावरण परिसरात निर्माण झाले आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांना पोषक असे वातावरण निर्मिती झाली आहे.

    वन्य प्राण्यांना उन्हाळ्यात उन्हापासून त्रास होऊ नये, म्हणून ते या भागात राहणे पसंत करतील. पर्यायी नागरिकांनी शेतकऱ्यांनी सावध राहण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. यासाठी वन विभागाने सर्वतोपरी पर्यायी उपाय योजना राबविल्या पाहिजे, अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे. अशी पर्यायी व्यवस्था वन विभागाने न केल्यास शिवारात वन्य प्राण्यांपासून भीती निर्माण होण्याची दाट शक्यता असल्याचेही चर्चिले जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Yaval : पाच महिलांच्या मंगळसूत्रांवर चोरट्याचा डल्ला अट्रावल यात्रेत गर्दीचा गैरफायदा

    February 1, 2026

    yaval : भुसावळ–यावल रस्त्यावर घडलेल्या एका धक्कादायक बसमध्ये सोन्याची पोत चोरी

    January 23, 2026

    “सत्तासंघर्ष थांबला! यावल नगरपरिषद समिती सभापती निवडीत ऐतिहासिक समझोता”

    January 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.