Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»मुक्ताईनगर»मुक्ताईनगरला आठ महिन्यानंतर मिळाले तहसीलदार
    मुक्ताईनगर

    मुक्ताईनगरला आठ महिन्यानंतर मिळाले तहसीलदार

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoMarch 21, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी

    गेल्या आठ महिन्यापासून रिक्त असलेल्या मुक्ताईनगरला अखेर तहसीलदार म्हणून गिरीश वखारे यांची नियुक्ती राज्य शासनाच्या महसूल विभागाने १५ फेब्रुवारी रोजी अध्यादेश काढून केलेली आहे. आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या राज्य शासनाच्या महसूल विभागाने केलेल्या आहे. त्यामध्ये श्री.वखारे यांचाही समावेश आहे. गिरीश वखारे हे तळोदा तहसील कार्यालय जिल्हा नंदुरबार येथे कार्यरत होते. गेल्या आठ महिन्यातील नियुक्त झालेले चवथे मुक्ताईनगर तहसीलदार श्री.वखारे यांनी १९ मार्च रोजी पदभार स्वीकारला आहे. श्री.वखारे यांनी २०१० मध्ये मुक्ताईनगर तहसीलमध्ये प्रशिक्षणार्थी तहसीलदार म्हणून काम केलेले आहे.

    मुक्ताईनगरच्या तत्कालीन तहसीलदार श्‍वेता संचेती यांची १२ जून २०२३ रोजी त्र्यंबकेश्‍वर, जि.नाशिक येथे बदली झाल्यानंतर येथील तहसिलदारांचे पद रिक्त होते. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. गेल्या आठ महिन्यांमध्ये चौथ्यांदा शासनाच्या महसूल विभागाने नियुक्ती केलेले नूतन तहसीलदार गिरीश वखारे यांनी पदभार स्वीकारला आहे.

    राजकीय दृष्ट्या संवेदनशील असलेल्या मुक्ताईनगर तालुक्यातील अवैध वाळू वाहतूक व्यवसायाला नवीन तहसीलदार यांच्याकडून आळा बसेल का? याकडे लक्ष लागून राहणार आहे. गेल्या आठ महिन्यापासून मुक्ताईनगर येथील निवासी नायब तहसीलदार डॉ. निकेतन वाडे यांनी प्रभारी तहसीलदार म्हणून पदभार सांभाळला होता.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    देशात पुरेसा एलपीजी साठा; अफवांकडे न जा, सरकारचा संदेश

    March 25, 2026

    Jalgaon : लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारीचा हप्ता लवकरच लाभार्थींच्या खात्यात जमा होणार

    March 25, 2026

    Muktainagar: हरताळा फाट्यानजीक भीषण अपघात राँग साइडने धावलेल्या कारने पाच मजुरांना उडविले

    March 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.