साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
विद्यार्थ्यांची उन्नती म्हणजे समाज आणि राष्ट्राची उन्नती होय. विद्यार्थी शाळेत फक्त शिकून आणि टिकून उपयोग नाही तर तो देशाचा आदर्श नागरिक आणि समाजाभिमुख व्यक्तिमत्व म्हणून उदयास आला पाहिजे. हाच शिक्षकांच्या प्रशिक्षणाचा उद्देश आहे, असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांनी प्रशिक्षणार्थी शिक्षकांना केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणेमार्फत अमळनेर येथील प्रताप हायस्कुलमध्ये २६ ते २८ दरम्यान माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण आयोजित केले होते. त्यावेळी ते बोलत होते.
विद्यार्थ्यांना दर्जेदार, गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले गेले पाहिजे. सामाजिक मूल्ये, पर्यावरणपूरक, व्यावसायिक शिक्षण दिले गेले पाहिजे, यासाठी शिक्षकांना नवनवीन तंत्रज्ञान शिकविण्यात आले. डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी निरंजन पेंढारे, प्रमिला अडकमोल, डॉ.भाग्यश्री वानखेडे, सुहास खांजोळकर, संजय सैंदाणे, असमालोद्दीन काझी, किरण सनेर, जी.एम.पाटील, दिनेश निघोट यांनी शिक्षकांना प्रशिक्षण दिले.