Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»शेरी शिवारात केबल चोरांचा सुळसुळाट
    क्राईम

    शेरी शिवारात केबल चोरांचा सुळसुळाट

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoFebruary 22, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, जामनेर : प्रतिनिधी

    तालुक्यातील पहूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शेरी शिवारातील शेरी-लोंढरी दरम्यानच्या पाझर तलावात शेरी आणि पहूर येथील शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिकल मोटारच्या केबल चोरट्यांनी लांबविल्या आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांच्या सलग तिसऱ्यांदा इलेक्ट्रीक केबलच्या चोऱ्या आहेत. यासंदर्भात शेतकऱ्यांनी पहूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलेली नाही. गेल्या वेळेस तक्रार दाखल करूनही काही एक फायदा होत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. त्यामुळेच यावेळी तक्रार दाखल केली नसल्याचेही शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे चोरट्यांचा कडक बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

    सविस्तर असे की, शेरी आणि पहूर भागातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी इलेक्ट्रिक मोटारी शेरी येथील धरणावर (पाझर तलाव) बसविलेल्या आहेत. उन्हाळा सुरू झाल्याने पिकांना मुबलक प्रमाणात पाणी देणे आवश्‍यक असतांना अज्ञात चोरट्यांनी २० ते २५ शेतकऱ्यांच्या तांब्याच्या केबल चोरून नेल्या आहेत. यावरुन चोरट्यांची हिम्मत वाढल्याचे परिसरात दिसून येत आहे. चोरट्यांनी या भागात तिसऱ्यांदा केबल चोरी केल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पुन्हा नवीन केबल खरेदी कराव्या लागत असल्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडले आहे.

    पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन सानप यांनी केबल चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेरी येथील रवींद्र पाटील, संजय बनकर, भारत सटाले, डिगंबर सटाले, समाधान तायडे, नथू पाटील, भगवान पाटील, संजय पाटील, शंकर काकडे, दादाराव सोनवणे, देवीदास पांढरे, एकनाथ पांढरे यांच्यासह पहूर येथील शेतकऱ्यांनी केली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Amalner : गावठी कट्ट्याचा घातक खेळ मित्रासमोरच सुटलेल्या गोळीने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

    March 28, 2026

    Muktainagar : मुक्ताईनगरजवळ भीषण अपघात; ट्रॅव्हल्सची ट्रकला जोरदार धडक

    March 28, 2026

    Illegal Gas Cylinders Seized : इंद्रप्रस्थ नगरात अवैध गॅस साठ्यावर पोलिसांची कारवाई; २१ सिलिंडर जप्त

    March 28, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.