पाचोऱ्यात गो.से. हायस्कुलमध्येे ‘आरोग्या’वर मार्गदर्शन

0
40

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो.से .हायस्कुल येथे ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानाअंतर्गत आरोग्य विषयांतर्गत बदलत्या जीवनशैलीमुळे लहान वयात येणारा लठ्ठपणा, त्याची कारणे, त्यावरील उपाय यासंबंधी संस्थेचे ज्येष्ठ संचालक तथा जनरल फिजिशियन डॉ. जयवंतराव पाटील यांनी मार्गदर्शन केले. मधुमेह आणि डोळ्यांचे विकार यासारख्या आजारांची माहिती आणि त्यावरील प्रतिबंधात्मक उपायावर नेत्र विकार तज्ज्ञ डॉ. सुनील पाटील यांनी मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांच्या वाढत्या आरोग्य समस्या आणि त्यावरील उपाय समस्यांवर त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात उपमुख्याध्यापक नरेंद्र पाटील यांनी आरोग्य विषयावर डॉक्टरांनी सांगितलेले उपाय विद्यार्थी योग्यपणे करतील, असे आश्‍वासन दिले. कार्यक्रमाला मुख्याध्यापिका प्रमिला वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्याध्यापक नरेंद्र पाटील, पर्यवेक्षिका अंजली गोहिल, प्रितमसिंग पाटील, प्रतिभा पाटील, रवींद्र बोरसे, सागर पाटील उपस्थित होते. यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन गायत्री पाटील आणि संगीता लासुरकर तर आभार विजय पाटील यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here