साईमत, पाळधी, ता.धरणगाव : वार्ताहर
येथील श्रीखंडे परिवाराने गोमातेचा खण नारळाने ओटी भरून केलेला सन्मान व प्राणीमात्रांवर व्यक्त केलेल्या प्रेमाने गायीच्या संवर्धनाचा आगळावेगळा संदेश दिला आहे.
येथील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश श्रीखंडे, सुभाष श्रीखंडे या दोन्ही बंधूंनी गाईला आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे प्रेम देऊन गरोदर गाईची खण नारळाने आप्तस्वकीय आणि ग्रामस्थांच्या साक्षीने ओटी भरली. अशा आगळ्यावेगळ्या कार्यक्रमास गोप्रेमी, महिला, पुरुष, बालगोपालांनी उपस्थिती दिली.
या माध्यमातून शेतकऱ्यांसह इतरांना पशुपालनासह दुग्ध व्यवसाय संवर्धनाची गोडी निर्माण होऊन प्रपंच नेटका करता येईल, अशी भावना श्रीखंडे परिवाराने व्यक्त केली.