साईमत जळगाव प्रतिनिधी
मोदी सरकारच्या योजना समाजविण्यासाठी भाजप नेत्यांचे ‘गाव चलो अभियान’ सुरू आहे. या अभियाना अंतर्गत दिनांक ९ फेब्रुवारी रोजी भाजपा जळगाव जिल्हा महानगर मंडल क्र ९ येथे आमदार राजुमामा भोळे यांनी घरोघरी जाऊन योजनांची पत्रके वाटत, केंद्र व राज्य सरकारी योजनांचा लाभ, विविध विकासकामे आदींची माहिती दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या भारतीय जनता पार्टी ‘गांव चलो अभियानात’ देशभरात सुरू असून. जळगाव जिल्हयात देखील या अभियानाला सुरुवात झाली असून जळगाव जिल्हा महानगरातील बूथ क्रमांक ३१९ येथे प्रवासी कार्यकर्ता म्हणून जबाबदारी घेत आमदार राजुमामा भोळे यांनी घरोघरी जाऊन योजनांची पत्रके वाटली, तसेच नागरिकांशी संवाद साधून त्यांना मोदी सरकारच्या योजना, कल्याणकारी कामे, केंद्र व राज्य सरकारी योजनांचा लाभ, विविध विकासकामे आदींची माहिती देण्यात आली. या अभियानात त्यांनी सामाजिक प्रभावशाली लाभार्थी उद्योजक, शैक्षणिक, खेळाडू, उद्यान, स्पोर्ट्स क्लब व जिम या सर्वाचे बूथ परिसरात भेठी घेतल्या.
या प्रसंगी जिल्हा सरचिणीस महेश जोशी, जिल्हा उपाध्यक्ष राहुल वाघ, मंडल अध्यक्ष महेश कापुरे , सुपर वरियर्स मिलिंद वाढे, बूथ प्रमुख पंकज सोनार, ललित बडगुजर, शाम पाटील आदींसह मोठया संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.