साईमत जळगाव प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी जळगाव महानगर जिल्ह्याच्या विश्वकर्मा योजना जिल्हा संयोजन पदी विजय रामदास शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदरचे नियुक्ती पत्र त्यांना नुकतेच देण्यात आले.
या निवडीबद्दल विजय शिंदे यांचे राज्याचे ग्रामविकास व पर्यटन ना.गिरीश महाजन, प्रदेश महामंत्री विजय चौधरी, प्रदेश मुख्यालय प्रभारी रवी अनासपुरे, खा. रक्षाताई खडसे, खा.उन्मेष पाटील,आ. राजूमामा भोळे,आ.संजय सावकारे, आ. मंगेश चव्हाण, माजी आ. स्मिता वाघ, प्रदेश चिटणीस अजय भोळे आदींनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.