Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»पाचोरा»मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांची धुळ्याला उपायुक्तपदी बदली
    पाचोरा

    मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांची धुळ्याला उपायुक्तपदी बदली

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoFebruary 10, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, पाचोरा : प्रतिनिधी

    येथील मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांची शासनाच्या आदेशानुसार धुळे उपायुक्तपदी नुकतीच बदली केली आहे. याबद्दल त्यांचा शुक्रवारी, ९ फेबु्रवारी रोजी नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांकडून निरोप समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी त्यांचा नगरपालिकेत उपस्थित मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. अध्यक्षस्थानी प्रभारी मुख्याधिकारी रवींद्र लांडे होते. चार वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी अनेक विकासकामे केली. शहरातील बेशिस्त असलेल्या हातगाड्यांना शिस्त लावण्याचे काम त्यांनी केले.

    सत्काराला उत्तर देतांना मुख्याधिकारी बाविस्कर म्हणाल्या की, शहरातील स्वच्छता, आरोग्य आदी कामे करण्यास प्राधान्य दिले. नगरपरिषदेच्या सर्व अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी कामात नेहमी सहकार्य केले. त्याचप्रमाणे शहराचा विकास करण्यासाठी रस्ते, खुल्या जागा, पथदिवे आदी विकास कामे करण्याकरीता आमदार किशोर पाटील, नगराध्यक्ष गोहील, सर्व पक्षीय नेते, प्रमुख पदाधिकारी यांनीही सहकार्य केले. त्यामुळेच चार वर्षाचा यशस्वी कार्यकाळ पूर्ण करु शकले. यावेळी कोवीड आजाराच्या पार्श्‍वभुमीवर केलेले काम सदैव स्मरणात राहील, असे म्हणतांना त्या भावूक झाल्या होत्या. अनेक कर्मचाऱ्यांनी आपल्या भावना शब्दातून व्यक्त केल्या. तसेच मनोगत व्यक्त करतांना कर्मचारीही भावूक झाल्याचे दिसून आले.

    यावेळी प्रभारी मुख्याधिकारी रवींद्र लांडे, उपमुख्याधिकारी दुर्गेश सोनवणे, करनिरीक्षक दगडू मराठे, अंतर्गत लेखापरीक्षक नितीन लोखंडे, संगणक अभियंता भारती निकुंभ, पाणी पुरवठा अभियंता जितेंद्र मोरे, आरोग्य निरीक्षक विरेंद्र घारु, भांडारपाल प्रगती खडसे, अर्जुन भोळे, लिपीक ललित सोनार, विशाल दिक्षीत, विलास देवकर, प्रकाश पवार, प्रकाश गोसावी, विजेंद्र निकम, मनोज पाटील, राजेश कंडारे, नरेश आदिवाल, गोपाल लोहार, किशोर मराठे, विलास कुंभार, गणेश अहिरे आदी कर्मचारी उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    देशात पुरेसा एलपीजी साठा; अफवांकडे न जा, सरकारचा संदेश

    March 25, 2026

    Jalgaon : लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारीचा हप्ता लवकरच लाभार्थींच्या खात्यात जमा होणार

    March 25, 2026

    Pachora:पाचोरा बायपासवर भरधाव ट्रक पलटला

    March 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.