Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»मराठा समाजासह खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणासाठी प्रशासन सज्ज
    जळगाव

    मराठा समाजासह खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणासाठी प्रशासन सज्ज

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoJanuary 22, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, जळगाव : प्रतिनिधी

    राज्य मागासवर्ग आयोगामार्फत होत असलेल्या मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणासाठी जळगाव जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. सर्वेक्षणासाठी नेमण्यात आलेल्या प्रगणक आणि पर्यवेक्षकांच्या प्रशिक्षणाची कार्यवाही पूर्ण झाली आहे. मंगळवारी, २३ जानेवारीपासून प्रत्यक्ष घरोघरी जावून सर्वेक्षणास प्रारंभ होणार आहे. सर्वेक्षणासाठी नियुक्त सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्यावर सोपविलेली जबाबदारी योग्यप्रकारे पार पडण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या आहेत.

    मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणासाठी जळगाव जिल्ह्यातील शहर महानगरपालिका, तालुक्यातील सर्व नगरपालिका/नगरपरिषदा व तालुक्यानिहाय सुमारे ८ हजारापेक्षा जास्त प्रगणक नेमण्यात आले आहेत. प्रत्येक तालुक्यात ठराविक प्रगणक राखीव असून उर्वरित प्रगणक प्रत्यक्ष सर्वेक्षणाची कार्यवाही करणार आहेत. सर्वेक्षणाच्या कामासाठी जिल्ह्यात सुमारे एक हजार पर्यवेक्षक नियुक्त केले आहेत. तसेच सर्वेक्षणाच्या कामकाजात समन्वय ठेवण्यासाठी प्रत्येक तालुक्यासाठी नोडल अधिकारी आणि सहायक नोडल अधिकारी नियुक्त केले आहेत.

    सर्वेक्षण अचूक, परिपूर्ण होण्यासाठी प्रशिक्षण

    जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणासाठी प्रगणक, पर्यवेक्षक यांची नेमणूक केली आहे. २३ जानेवारीपासून प्रगणक घरोघरी जावून सर्वेक्षणाला सुरुवात करतील. सर्वेक्षणासाठी मोबाईल ॲप्लिकेशन तयार करण्यात आले असून नागरिकांनी सांगितलेली माहिती प्रगणक या मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये भरणार आहेत. सर्वेक्षणाची कार्यवाही अचूक, परिपूर्ण होण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगणक आणि पर्यवेक्षक यांना गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स, पुणे येथील मास्टर ट्रेनरच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणात मोबाईल ॲप्लिकेशनची माहिती देण्यात आली आहे. जिल्हा आणि तालुकास्तर असे दोन टप्प्यात प्रशिक्षण पार पडले. शनिवारी जिल्हास्तरीय प्रशिक्षणात जिल्ह्यातील मास्टर ट्रेनर्स यांचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच दुसऱ्या टप्प्यात सोमवारी प्रगणक आणि पर्यवेक्षक यांना प्रत्येक तालुकास्तरावर प्रशिक्षण देण्यात आले.

    सर्वेक्षणासाठी प्रगणकांना सहकार्य करावे : जिल्हाधिकारी

    मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. याबाबतचे दोन्ही टप्प्यातील प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. मंगळवारपासून प्रगणक घरोघरी जावून सर्वेक्षणाला प्रारंभ करणार आहेत. जिल्ह्यातील सर्वेक्षण अचूक आणि परिपूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला नागरिकांचे सहकार्य आवश्‍यक आहे. सर्वेक्षणासाठी घरी येणाऱ्या प्रगणकांना नागरिकांनी आवश्‍यक माहिती देवून सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon:जळगाव प्रभाग ७ मध्ये भटक्या कुत्र्यांची वाढती भीती, नगरसेविकांची महापौरांकडे तातडीची मागणी

    March 2, 2026

    Jalgaon:महापालिकेत नवीन जेसीबी व अग्निशमन वाहनांचा समावेश

    March 2, 2026

    Amalner:शेतकरी गौरवासाठी अमळनेरमध्ये उभा होणार अजित पवारांचा पुतळा

    March 2, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.