टहाकळीला श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा

0
67

साईमत, पाळधी, ता .धरणगाव : वार्ताहर

येथे नव्यानेच अशोक पाटील यांच्या सहकार्याने श्रीविठ्ठल रूक्मिणी मंदिर उभारण्यात आले. मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी अशोक पाटील आणि ग्रामस्थांतर्फे सप्ताहाचे आयोजन केले होते. सोमवारी, २२ जानेवारी रोजी मुहूर्ताचे औचित्य साधून ग्रामस्थांनी प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित केला होता. याठिकाणी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत विधिवत पूजा करून प्राणप्रतिष्ठा पार पडली. अध्यक्षस्थानी अशोक पाटील होते. यावेळी किर्तनकार ह.भ.प. तुकाराम महाराज चिंचोलकर यांचे काल्याचे कीर्तन झाले.

गावात चौकाचौकात काढलेल्या विविध रांगोळ्या लक्ष वेधून घेत होत्या. महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. संपूर्ण गावात भगवे झेंडे, पताका, बॅनर व स्वागत कमानीमुळे गावासह मंदिर परिसर भगवामय झाला होता. याप्रसंगी व्यासपीठावर अशोक पाटील, अशोक सदावर्ते, किर्तनकार ह.भ.प. तुकाराम महाराज, गोपाल महाराज, जितू महाराज, माजी उपसभापती सचिन पाटील, सरपंच सविता सुरेश कोळी, उपसरपंच मधुकर पाटील, माजी सरपंच दीपक चव्हाण, मंदिर उभारणीसाठी गावातील सामाजिक कार्यकर्ते शांताराम पाटील, नारायण पाटील, कैलास पाटील, यादव पाटील, प्रवीण पाटील, अनिल पाटील, गोरख पाटील, काशिनाथ चौधरी, फुलपाट व दोनगाव येथील भजनी मंडळ आदी उपस्थित होते. संपूर्ण गावातील अबाल वृध्दांंसह महिला हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

पिंप्री येथे श्रीरामाची पालखीची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी याठिकाणी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी श्रीरामाचे दर्शन घेतले. यावेळी श्रीराम भक्तांनी पालकमंत्र्यांना खांद्यावर घेतले असता ना. गुलाबराव पाटील यांनी आग्रहाखातर डीजेवर ताल धरत राम भक्तांचा उत्साह द्विगुणीत केला. तसेच झुरखेडा येथे पालकमंत्र्यांनी भेट देवून श्रीराम प्रतिमेचे दर्शन घेतले. प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते अशोक सदावर्ते, सूत्रसंचालन ह.भ.प.गोपाळ महाराज तर आभार सरपंच सविता कोळी यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here