साईमत, फैजपूर : प्रतिनिधी
श्री तीर्थक्षेत्र अयोध्या येथे होणाऱ्या प्रभू रामलल्ला प्राणप्रतिष्ठा महोत्सवानिमित्त फैजपूर नगरी भगवामय होऊन सजली आहे. शहरात ठिकठिकाणी श्रीराम प्रभुच्या बॅनर, ध्वज, पताका आदींनी सुशोभीकरण करून भरभरून उत्साह पूर्ण कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. शहरातील राम मंदिरात प्रतिमेचे पूजन भाजपचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानिमित्त माजी नगराध्यक्ष पिंटू राणे यांच्याकडून राम मंदिरामध्ये एक हजार झेंड्यांचे वाटप करण्यात आले. सायंकाळी भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. प्रसिद्ध तीर्थक्षेत्र खंडोबा वाडी येथे सव्वा लाख दिवे प्रज्ज्वलित करण्यासाठी व्यवस्था केली आहे.
मोटर सायकल रॅलीप्रसंगी माजी नगराध्यक्ष पांडुरंग सराफ, भाजपाचे शहराध्यक्ष अनंता नेहेते, महिला तालुकाध्यक्ष जयश्री चौधरी, अनुराधा ताई, वसंत परदेशी, भारती पाटील, नरेंद्र नारखेडे, तुषार पाठक, संदीप भारंबे, सिध्देश्वर वाघुळदे, किरण चौधरी, वैभव वकारे, अक्षय परदेशी, राजू महाजन, विनोद बोरोले, रामा होले, मनोज चौधरी, मनोज सराफ यांच्यासह शहरातील युवा कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
