Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»जळगाव जनता सहकारी बँकेच्या स्थापना दिनानिमित्त स्नेहमिलनाचे आयोजन
    जळगाव

    जळगाव जनता सहकारी बँकेच्या स्थापना दिनानिमित्त स्नेहमिलनाचे आयोजन

    SaimatBy SaimatJanuary 21, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत जळगाव प्रतिनिधी

    जळगाव जनता सहकारी बँकेच्या स्थापनेस दि. २० जानेवारी रोजी ४५ वर्ष पूर्ण झाली असून त्या निमित्ताने बँकेच्या मुख्य कार्यालयात स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. स्थापना दिनाचे औचित्य साधून बँकेचे मुख्यालय सेवा येथे श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते.

    मुख्य कार्यालयात बँकेचे वरिष्ठ महाव्यवस्थापक सुनील अग्रवाल यांचे हस्ते श्री सत्यनारायण महापूजा झाली. स्थापना दिनाचे औचित्य साधून आयसीआयसीआय लोम्बार्डच्या रिजनल मॅनेजर सेजल संपत , सीनियर मॅनेजर आरती मोरे यांनी बँकेसोबत सामंजस्य करार केला.

    यावेळी मोठ्या प्रमाणात बँकेचे सभासद, ग्राहक व हितचिंतक तसेच विविध वृत्तपत्रांचे प्रतिनिधींनी व आमदार राजुमामा भोळे यांनी मुख्य कार्यालयात शुभेच्छा दिल्या. बँक नेहमीच आधुनिक तंत्रज्ञांनाचा वापर करून आपल्या ग्राहकांना अनेक सुविधा उपलब्ध करून देत असते कार्यक्रमाच्या प्रसंगी बँकेचे अध्यक्ष सतीश मदाने, उपाध्यक्ष कृष्णा कामठे, संचालक अनिल राव , संचालिका डॉ. आरती हुजुरबाजार, संचालक हरिश्चंद्र यादव, डॉ. अतुल सरोदे, जयंतीलाल सुराणा, विवेक पाटील, सीए नितीन झंवर, संजय प्रभुदेसाई, डॉ. सुरेन्द्र सुरवाडे, हिरालाल सोनवणे, सुशील हासवाणी, सपन झुनझुनवाला, डॉ पराग देवरे, संचालिका संध्या देशमुख, सीए सुभाष लोहार, जवाहरभाई पटेल, राजेंद्र भारुडे, केशवस्मृति सेवा संस्था समूहाचे प्रमुख भरतदादा अमळकर, बँकेचे माजी अध्यक्ष संजयजी बिर्ला, मुख्य कार्यकारी अधिकारी(प्र) संजय नागमोती, वरिष्ठ महाव्यवस्थापक सुनील अग्रवाल, कर्मचारी प्रतिनिधी हेमंत चंदनकर, ओंकार पाटील व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    याचप्रमाणे दाणाबाजार शाखेचा व स्टेशन रोड शाखेचा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी दाणाबाजार शाखेतर्फे रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले. तसेच ८० लाखाचे कर्ज वितरित करण्यात आले. याप्रसंगी संचालक हिरालाल सोनवणे, सुशील हासवाणी, संध्या देशमुख आदी उपस्थित होते.
    स्टेशन रोड शाखेतर्फे आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले. तसेच एक कोटी २८ लाखाचे कर्ज वितरित करण्यात आले. याप्रसंगी ह.भ.प. मंगेश महाराज जोशी, बँकेचे अध्यक्ष सतीश मदाने, संचालिका संध्या देशमुख आदी उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Bhusawal:साकरीत पोलिसांची धडक कारवाई; अवैध दारू पकडली

    March 22, 2026

    PM Narendra Modi record : पंतप्रधान नरेंद्र मोदींना ऐतिहासिक टप्पा; भारतीय राजकारणातील सर्वाधिक काळ सत्ताप्रमुख

    March 22, 2026

    Bhusawal : विवाहितेवर शारीरिक व मानसिक छळ; माहेरून १ लाख रुपये आणण्यास दबाव, पतीसह ६ जणांविरुद्ध गुन्हा

    March 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.