साईमत, पारोळा : प्रतिनिधी
पारोळ्याजवळ गॅस सिलिंडरच्या टँकरचा अपघात झाल्याची घटना शनिवारी, २० जानेवारी रोजी मध्यरात्री घडली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार व पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. घटनास्थळी दोन रुग्णवाहिका पोहोचल्या आहेत. अग्निशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी दाखल झाल्याने आग विझविण्यात आली होती. आगीत कोणतेही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात आले.
पारोळा गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाल्याने गॅस सिलेंडरने भरलेल्या टँकरला भीषण आग लागल्याची घटना शनिवारी, २० जानेवारी रोजी मध्यरात्री घडली होती. अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पारोळा येथील तहसीलदार आणि पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच अग्निशमन पथक आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले होतेे.
अग्निशमनच्या बंबाने आग आटोक्यात आणण्यात आली. पुढील दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक पावले उचलली जात आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि पोलीस अधीक्षक एम.राजकुमार आपत्कालीन प्रतिसादाचे निर्देश देत आहेत. पारोळा येथील आ.चिमणराव पाटील हे घटनास्थळी दाखल झाले होते.