Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»अमळनेर»शालेय जीवन आयुष्यातील सोनेरी पान : ना. अनिल पाटील
    अमळनेर

    शालेय जीवन आयुष्यातील सोनेरी पान : ना. अनिल पाटील

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoJanuary 14, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, अमळनेर : प्रतिनिधी

    विद्यार्थी जीवनात शिस्त, जिद्द, चिकाटी अशा त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास यशाचा राजमार्ग सापडत असतो. त्यामुळे शालेय जीवन आयुष्यातील सर्वात सोनेरी पान असल्याचे प्रतिपादन मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना.अनिल पाटील यांनी केले. जी.एस.हायस्कुल आणि कै.र.सा.पाटील प्राथमिक शाळेच्या २ दिवसीय स्नेहसंमेलनात अध्यक्षीय मनोगतात ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बांधकाम व्यावसायिक तथा संस्थाचालक ओमप्रकाश मुंदडा, मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील भामरे, महावीर पतसंस्थेचे चेअरमन प्रकाशचंद पारख उपस्थित होते.

    शहरातील खान्देश शिक्षण मंडळ संचलित जी.एस.हायस्कुल व कै.र.सा.पाटील प्राथमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन १२ व १३ जानेवारी रोजी उत्साहात पार पडले. यावेळी खा.शि.मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ.अनिल शिंदे, कार्योपाध्यक्ष तथा कै.र.सा.पाटील शाळेचे चेअरमन प्रदीप अग्रवाल, जी.एस.हायस्कुलचे चेअरमन हरी वाणी, खा.शि.मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र झाबक, उपाध्यक्ष जितेंद्र देशमुख, माधुरी पाटील, विश्‍वस्त वसुंधरा लांडगे, संचालक सी.ए.नीरज अग्रवाल, विनोद पाटील, शिक्षक प्रतिनिधी विनोद कदम, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष नितीन भदाणे, मुख्याध्यापक बी.एस. पाटील, उपमुख्याध्यापक सी.एस पाटील, डी.आर.कन्या.शाळेचे उपमुख्याध्यापक एस.बी.निकम, पर्यवेक्षक ए.डी.भदाणे, एस.आर.शिंगाणे, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका एस.पी.शिसोदे, कैलास पाटील, महाविद्यालयीन प्राध्यापक प्रतिनिधी आर.एन.पारधी, सेवानिवृत्त मुख्याध्यापक पी.एल.मेखा, आर.एल. माळी, वाडी संस्थानचे शारंगधर गुरुजी, शिक्षकेत्तर प्रतिनिधी एस.एम.पवार उपस्थित होते.

    ते पुढे म्हणाले की, स्नेहसंमेलातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळत असतो. सांस्कृतिक कार्यक्रमातून कलाकार तयार होत असतात. खान्देश शिक्षण मंडळ संस्थेचा नावलौकिक खूप मोठा आहे. संस्थेच्या व शाळेच्या विकासासाठी येणाऱ्या काळात विशेष फंडातून निधी देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. १२ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता आनंद मेळाव्याचे उद्घाटन ना.अनिल पाटील तसेच मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळेच्या ध्वजाचे ध्वजारोहण करून जी.एस.हायस्कूल व कै.र.सा.पाटील शाळेच्या नावाचा लोगो फुग्यांच्या सहाय्याने आकाशात सोडण्यात आला.

    दुपार सत्रात भारुड, नाटक, आदिवासी नृत्य, आध्यात्मिक गीत तसेच मराठी, हिंदी चित्रपटातील सदाबहार नृत्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता. १३ रोजी शेलापागोटे, प्रश्‍नमंजुषा, फॅन्सी ड्रेस तसेच विविध स्पर्धांचे बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी डॉ.अनिल शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

    प्रास्ताविक मुख्याध्यापक बी.एस.पाटील, स्नेहसमेलनाच्या विविध सत्रांचे सूत्रसंचालन उपशिक्षक अमित पाटील, एम.ए.पाटील, उपशिक्षिका जे.बी.इंगळे, टी.एम.शेख, देवयानी भावसार तर आभार उपमुख्याध्यापक सी.एस.पाटील यांनी मानले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Amalner:चार जणांकडून साईड न दिल्याच्या वादातून व्यापाऱ्याच्या कारची तोडफोड

    February 20, 2026

    Amalner : अमळनेर पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत गांजाची एक बिघा शेती उध्वस्त

    February 7, 2026

    Amalner : पिळोदे गावात पिसाळलेल्या कुत्र्याची दहशत

    February 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.