Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»पाचोरा»पाचोऱ्यात शासनाच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन
    पाचोरा

    पाचोऱ्यात शासनाच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoJanuary 12, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, पाचोरा : प्रतिनिधी

    शेतकऱ्यांच्या मालाला शासकीय हमीभावाने खरेदी करण्यासाठी खरेदी केंद्र सुरू करावे, केंद्राचे आयात निर्यात धोरण तातडीने रद्द करावे, हिट अँड रन कायदा रद्द केला पाहिजे, शेतकऱ्यांच्या घरात अद्याप मागील व चालू वर्षाचे कापूस पडून आहे. शेतकऱ्यांचे देणं घेणं थांबून गेले आहे. अशीच गंभीर परिस्थिती असेल तर आत्महत्या कशा थांबतील. आधी शेतकऱ्यांचे व जनतेचे अति महत्त्वाचे प्रश्‍न घेऊन शासनाच्या विरोधात शुक्रवारी १२ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता शिवसेनेच्या वैशाली सूर्यवंशी, नीलकंठ पवार अध्यक्ष कृषी संघटना, गुलाबराव प्रताप, सचिन सोमवंशी राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष, विशाल बागुल वंचित बहुजन आघाडी, प्रवीण पाटील संभाजी ब्रिगेड, जिल्हाध्यक्ष मोहन भिका पाटील ओन्ली ड्रायव्हर संघटना अध्यक्ष आदी मान्यवरांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करण्यात आला.

    ऑगस्ट महिन्यातील पावसाच्या दांडीमुळे बळीराजांचे उत्पन्न कमालीचे घटले आहे. थोडेफार आलेले उत्पन्न बाजारपेठेत कवडीमोल भावाने मागतात. कर्जाच्या ओझ्याखाली बसलेल्या शेतकऱ्यांनी संसाराचा गाडा कसा चालवायचा, असा यक्ष प्रश्‍न सतत भेडसावत राहतो. कापूस हे पांढरं सोनं, ज्वारी, उडीद, मूग, चवळी तूर, सोयाबीन, मका आदी पिकांचे उत्पन्न अत्यल्प पावसाने प्रचंड प्रमाणावर घटले. त्यामुळे बळीराजांचे कंबरडे मोडले गेले. शेतकऱ्यांच्या नशिबी आलेल्या गंभीर व भयावह परिस्थितीत शासनाने खंबीरपणे उभे राहून
    शेतकऱ्यांच्या मालाला शासकीय हमीभावाने खरेदी करा, अशी मागणी रास्ता रोकोत करण्यात आली.

    आंदोलनात पाचोरा-भडगाव तालुक्यातून अरुण पाटील, ॲड.अभय पाटील, शरद पाटील, अनिल सावंत, भरत खंडेलवाल, पप्पू राजपूत, ज्ञानेश्‍वर चौधरी, भारत पाटील, विनोद राऊळ, हेमंत पाटील, नितीन लोहार, प्रेमचंद पाटील, विनोद बाविस्कर, दादा चौधरी, खंडू सोनवणे, विकास वाघ, संदीप जैन, मनोज चौधरी, हरीश देवरे, चंद्रकांत पाटील, मंदाकिनी पारोचे, जयश्री येवले, अनिता पाटील, अनिल पाटील भडगाव तालुकाप्रमुख, विजय साळुंखे, रतन परदेशी, शरद पाटील, फकीरा पाटील, रवींद्र पोपट पाटील, शामकांत पाटील, माधव जगताप, चेतन पाटील, मदन पाटील, भैय्या सूर्यवंशी, योजना पाटील, सुषमा भावसार, रिना पाटील, मनिषा पाटील, सविता चौधरी, सोनाली पाटील, कल्पना पाटील, रेखा शिरसाट, शशी पाटील, युवासेना तालुका अधिकारी ज्ञानेश्‍वर चौधरी, प्रेमचंद पाटील, आण्णा परदेशी, अनिल परदेशी, गणेश पाटील, जयसिंग परदेशी, शरद पाटील सरपंच सावखेडा, सुनील परदेशी, अरुण तांबे, रवींद्र पाटील, बाळू पाटील, सुदर्शन पाटील, संजु पाटील, भाऊसाहेब पाटील, पंकज पाटील, पुंडलिक जिभू पाटील, सुनील डामरे, युवराज धोबी, प्रितेश जैन, भावडू राजपूत, भिकन तडवी, भाईदास धुमाळ, रामकृष्ण पाटील, देविदास सांडू पाटील, भगवान पाटील, भूषण कासार, अजय तेली, अरुण सोमवंशी, बाळू मोरे, सचिन राजपूत, भूपेश सोमवंशी, दत्तू भोई, योगेश समारे, विठ्ठल राजपूत, अतुल चौधरी यांच्यासह समस्त पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Pachora-Jalgaon : पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री मृत्यूचा थरार

    February 7, 2026

    Pachora : पाचोर्‍यात खळबळजनक आणि संतापजनक घटना

    February 4, 2026

    Pachora : अनुदानासाठी लाच मागणाऱ्यांना लाचलुचपतचा दणका

    February 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.