Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्रीडा»दिवसभर मोलमजुरी, सायंकाळी सराव; राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत ईश्वरीची कमाल
    क्रीडा

    दिवसभर मोलमजुरी, सायंकाळी सराव; राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत ईश्वरीची कमाल

    Kishor KoliBy Kishor KoliJanuary 11, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नागपूर : वृत्तसंस्था

    परिस्थिती अनुकूल असेल, सर्व सुविधा उपलब्ध असेल, प्रशिक्षण देणारे असेल तर स्पर्धेत मिळणारे यश समजण्यासारखे असते. पण परिस्थिती प्रतिकूल असेल, प्रशिक्षण, इतर सुविधा तर सोडाच पण रोज कष्ट करून उदरनिर्वाह करावा लागत असेल तर अशा स्थितीत एका राष्ट्रीय स्पर्धेत एखादी महिला घवघवीत यश संपादित करत असेल तर कौतुकास्पद ठरते. नागपूरमध्ये एका मोलमजुरी करणाऱ्या महिलेने राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत मिळवलेले यश असेच आहे.
    ६-७ जानेवारी, २०२४ दरम्यान पोरबंदर (गुजरात ) येथे आयोजित अखिल भारतीय सागरी जलतरण स्पर्धेत ३० ते ४५ वयोगटात नागपुरातील ४० वर्षीय ईश्वरी वाटकरने ५ किलोमीटर अंतर २ तास ४२ मिनिटांत पूर्ण करुन दुसरा क्रमांक पटकाविला. गौरव चिन्ह व रोख बक्षीस देऊन तिला गौरविण्यात आले. या स्पर्धेत देशभरातून विविध गटांत ९५० हून जास्त जलतरणपटू सहभागी झाले होते.
    ईश्वरेी नागपूरच्या लेन्ड्रा पार्कमध्ये मोलमजुरीचे काम करते. दिवसभर मजुरी करुन ती आपला पोहण्याचा छंद जोपासते. यापूर्वीसुध्दा तिने अनेक सागरी लांब पल्याच्या स्पर्धा गाजविल्या आहेत. ती अंबाझरी स्विमिंग क्लबची सदस्य आहे. भोजराज मेश्राम व मनोहर मुळे यांचे तिला मार्गदर्शन लाभले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Kishor Koli

    Related Posts

    Jalgaon : महिलांनी क्रीडा क्षेत्रात पुढे यावे मंत्री रक्षाताई खडसे

    March 8, 2026

    India vs England Semi-Final: उपांत्य फेरीत टीम इंडियाचा प्लेइंग 11 निर्णय, बेंचवर बसणार हे चार महत्त्वाचे नाव

    March 5, 2026

    Jalgaon : नैराश्यातून तरुण विद्यार्थ्याची आत्महत्या प्राचार्यांवर गंभीर आरोप

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.