Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»रावेर लोकसभा मतदारसंघात डॉ. केतकी पाटील यांचे ‘गाव तेथे संपर्क अभियान’
    जळगाव

    रावेर लोकसभा मतदारसंघात डॉ. केतकी पाटील यांचे ‘गाव तेथे संपर्क अभियान’

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoJanuary 7, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, जळगाव : प्रतिनिधी

    देशभरात लोकसभा निवडणुकीचे वातावरण आता तापू लागले आहे. केंद्रीय राजकारणात मोठे योगदान राहिलेल्या जळगाव जिल्ह्यात जळगाव आणि रावेर असे दोन लोकसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी रावेर लोकसभा मतदारसंघाकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. दरम्यान धर्तीवर रावेर लोकसभा मतदारसंघात सुशिक्षीत अन्‌ राजकीय बाळकडू मिळालेल्या गोदावरी फाऊंडेशनच्या संचालिका डॉ. केतकी पाटील यांचे ‘गाव तेथे संपर्क अभियान’ सुरू आहे. या अभियानाच्या माध्यमातून डॉ. केतकी पाटील यांच्या राजकीय वाटचालीकडे संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.

    लोकसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वाधिक चर्चा होत आहे ती रावेर लोकसभा मतदारसंघाची. जळगाव जिल्ह्यातील रावेर आणि जळगाव हे दोन्ही लोकसभा मतदारसंघ गेल्या २० वर्षापासून भाजपाच्या ताब्यात आहेत. १९९८ चा काळ वगळता या मतदारसंघातून भाजपा व्यतीरिक्त इतर पक्षाच्या उमेदवारांना पराभव पहावा लागला आहे. सामाजिकदृष्ट्या लेवा आणि मराठा बहुल असलेल्या मतदारसंघाची राजकीय गणिते आत्तापर्यंत एकहाती होती. मात्र, आता रावेर मतदारसंघातील राजकीय परीस्थिती बदलली आहे. नवीन, तरूण, उच्च शिक्षित आणि स्वतःची ओळख असलेल्या उमेदवारांविषयीची चर्चा मतदारसंघात होऊ लागली आहे.

    समाजकारणाचा वसा घेत डॉ. केतकी पाटील यांनी ‘गाव तेथे संपर्क अभियान’ सुरू केले आहे. या अभियानांतर्गत स्वतः ची ओळख निर्माण करणे, रावेर लोकसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, नवनियुक्त पदाधिकारी यांचा सत्कार डॉ. केतकी पाटील यांच्यातर्फे केला जात आहे. एवढेच नव्हे तर संपर्क अभियानाच्या माध्यमातून मतदारसंघातील प्रश्‍नांचेही अवलोकन डॉ. केतकी पाटील ह्या करीत आहेत.

    संपर्क अभियानाला चांगला प्रतिसाद

    ‘मेरी माटी मेरा देश’ अभियानाची सुरुवात डॉ. केतकी पाटील यांनी जिल्ह्यात सर्व प्रथम करून अंमलबजावणी केली. मतदासंघात असलेल्या समस्या व त्यावरील उपाय योजना याची माहिती आणि मतदारसंघात नव्याने काय करता येईल? अशा पध्दतीचा विचार घेऊन डॉ. केतकी पाटील यांच्या संपर्क अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने समाजसेवेसोबतच डॉ. केतकी पाटील यांच्या राजकीय वाटचालीकडेही मतदारसंघाचे लक्ष लागले आहे. तत्पूर्वी डॉ. केतकी पाटील यांची एक तरूण आणि सुशिक्षीत उमेदवार म्हणून रावेर मतदारसंघासाठी जोरदार चर्चा होत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Chalisgaon : चाळीसगाव शहरात भरवस्तीत घरफोडी; सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास

    February 26, 2026

    Jalgaon:जळगाव शहरात भरदिवसा ८ लाखांची रोकड लंपास; दुचाकी डिक्की फोडून चोरटा फरार

    February 26, 2026

    Chopra:१० हजारांच्या कर्जासाठी २ लाख व्याज भरूनही तरुणाची आत्महत्या

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.