Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्रीडा»आयसीसीने स्टंपिंग आणि कन्कशनच्या नियमात केला बदल
    क्रीडा

    आयसीसीने स्टंपिंग आणि कन्कशनच्या नियमात केला बदल

    Kishor KoliBy Kishor KoliJanuary 4, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवीदिल्ली : वृत्तसंस्था
    नवीन वर्षाच्या मुहूर्तावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) खेळाच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. या बदलांनंतर, खेळाडू नियमांचा वापर करून अयोग्य फायदा घेऊ शकणार नाहीत. स्टंपिंगबाबत आयसीसीने सर्वात मोठा नियम बदलला आहे. यासंबंधीचे रिव्ह्यू आता फक्त साइड-ऑन कॅमेरे पाहूनच घेतले जातील. याचा अर्थ स्टंपिंगबाबतचे अपील जेव्हा थर्ड अंपायरपर्यंत पोहोचते, तेव्हा ते चेंडू बॅटला लागला की नाही हे पाहणार नाहीत. ते फक्त स्टंपिंगबाबतच निर्णय देतील.
    आयसीसीने बदललेले नियम १२ डिसेंबर २०२३ पासून लागू झाले आहेत.
    जर एखाद्या संघाला स्टंपिंग प्रक्रियेत कॅच-बिहाइंड तपासायचे असेल, तर त्याला आता कॅच-बिहाइंड अपीलसाठी वेगळा डीआरएस पर्याय वापरावा लागेल. गेल्या वर्षीच्या सुरुवातीला भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत, ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षक ॲलेक्स कॅरीने संघाचा डीआरएसचा पर्याय न वापरता यष्टीमागे झेल घेतल्याबद्दल रिव्ह्यू वापरला होता.

    काय म्हटले आहे नियमात?
    आयसीसीच्या नवीन दुरुस्तीमध्ये असे म्हटले आहे की, “नवीन नियम स्टंपिंगचे रिव्ह्यू केवळ स्टंपिंगच्या तपासणीपुरते मर्यादित करते, त्यामुळे क्षेत्ररक्षण संघाला रिव्ह्यूदरम्यान इतर कोणत्याही पद्धतीने फलंदाज बाद आहे का नाही, तपासणीसाठी मोफत रिव्ह्यू मिळणार नाहीत.”

    कन्कशन रिप्लेसमेंट
    नियमांमध्येही बदल
    आयसीसीने कन्कशन रिप्लेसमेंट नियमांमध्येही अधिक स्पष्टता आणली आहे. दुखापत झालेल्या खेळाडूला गोलंदाजी करण्यापासून निलंबित केले असल्यास, त्याच्या बदली खेळाडूला गोलंदाजी करण्याची परवानगी दिली जाणार नाही. याव्यतिरिक्त, आयसीसीने मैदानावरील दुखापतींचे मूल्यांकन आणि उपचारासाठी दिलेला वेळ चार मिनिटांपर्यंत मर्यादित केला आहे.

    बीसीसीआय आपले
    नियम कायम ठेवेल
    आयसीसीच्या नियमांमधील या बदलांसह, बीसीसीआयने शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या रणजी ट्रॉफीमध्ये गेल्या वर्षीच्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफीदरम्यान लागू केलेला डेड बॉल आणि प्रति ओव्हर दोन बाऊन्सरचा नियम सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Kishor Koli

    Related Posts

    Jalgaon : महिलांनी क्रीडा क्षेत्रात पुढे यावे मंत्री रक्षाताई खडसे

    March 8, 2026

    India vs England Semi-Final: उपांत्य फेरीत टीम इंडियाचा प्लेइंग 11 निर्णय, बेंचवर बसणार हे चार महत्त्वाचे नाव

    March 5, 2026

    Jalgaon : नैराश्यातून तरुण विद्यार्थ्याची आत्महत्या प्राचार्यांवर गंभीर आरोप

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.