Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»तांबापुरा परिसरात ४२ वर्षीय इसमाची गळफास घेऊन आत्महत्त्या
    क्राईम

    तांबापुरा परिसरात ४२ वर्षीय इसमाची गळफास घेऊन आत्महत्त्या

    Kishor KoliBy Kishor KoliJanuary 2, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी
    दुर्धर आजाराला कंटाळून तांबापूरा येथील एका ४२ वर्षीय प्रौढ व्यक्तीने राहत्या घरामध्ये गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना मंगळवारी २ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सतिष बाबुराव ससाणे असे मृत व्यक्तीचे नाव असून याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
    याबाबत अधिक माहिती अशी की, सतिष ससाणे हे तांबापुरा येथे पत्नी, दोन मुले आणि मुलगीसह वास्तव्यास होते. मिळले ती हातमजुरी करून ते कुटूंबाचा उदरनिर्वाह करत होते. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून ते एका दुर्धर आजारापासून त्रस्त होते. मंगळवारी २ जानेवारी रोजी सकाळी पत्नी कामावर तर मुले बाहेर गेले होते. त्यामुळे ते घरी एकटेच होते. सकाळी पुतण्याला त्यांनी नाश्ता घेण्यासाठी पाठविले. याच दरम्यानात त्यांनी राहत्या घरामध्ये गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली. साडेदहा वाजेच्या सुमारास पुतण्या नाश्ता घेवून आल्यावर त्याला काका सतिष ससाणे यांनी गळफास घेतल्याचे दिसताच, त्याने आरडा-ओरड केली. यानंतर आसपासच्या रहिवाशांची गर्दी झाली होती. ससाणे यांना लागलीच खाली उतरवून जिल्हा रूग्णालयात नेण्यात आले. तेथे वैद्यकिय अधिका-यांनी तपासणीअंती मृत घोषित केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Kishor Koli

    Related Posts

    Chalisgaon : चाळीसगाव तालुक्यातील पोलीस कर्मचाऱ्याने संपविले जीवन

    March 9, 2026

    Amalner : भरधाव दुचाकीची भीषण धडक विटनेर येथील ४८ वर्षीय प्रौढाचा मृत्यू

    March 9, 2026

    Bhadgaon : भडगावात मुलांना वाचवताना दोन तरुणांचा गिरणा नदीत बुडून मृत्यू

    March 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.