Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्रीडा»राहुलचे शतक ३ भारतीय खेळाडूंसाठी ठरणार धोक्याची घंटा
    क्रीडा

    राहुलचे शतक ३ भारतीय खेळाडूंसाठी ठरणार धोक्याची घंटा

    Kishor KoliBy Kishor KoliDecember 28, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    सेंच्युरियन : वृत्तसंस्था

    भारतीय क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असून, ते सध्या सेंच्युरियनमध्ये दक्षिण आफ्रिकेसोबत दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळत आहेत. या बॉक्सिंग डे टेस्टमध्ये भारतीय संघाची टॉप ऑर्डर पूर्णपणे फ्लॉप झाली. मात्र,त्यानंतर यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलने जबाबदारी स्वीकारली आणि दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची शाळा घेतली. राहुलने भयानक झालेल्या खेळपट्टीवर जिथे प्रचंड बाउन्स आणि स्विंग होत असताना शतक झळकावले.
    राहुलने अवघड विकेटवर शतक झळकावून इतिहास रचला. त्याने १३७ चेंडूत १४ चौकार आणि ४ गगनचुंबी षटकारांसह १०१ धावा केल्या. या शानदार कामगिरीच्या जोरावर राहुलने कसोटी संघातील आपले स्थान पक्के केले आहे. राहुलच्या या शतकामुळे या टीम इंडियाच्या ३ खेळाडूंची कसोटी कारकीर्द आता धोक्यात आली आहे.

    केएस भरत
    भारतीय संघाचा यष्टिरक्षक फलंदाज केएस भरत याचे यष्टिरक्षण कौशल्य चांगले आहे. पण त्याची फलंदाजी बाजू ही कमकुवत दुवा आहे. अशा परिस्थितीत आता केएल राहुल त्याच्या जागी सहजपणे कसोटी संघात स्थान मिळवू शकतो. आता त्याच्यासाठी कसोटी संघात स्थान मिळवणे अधिक कठीण होणार आहे.

    इशान किशन
    टीम इंडियाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनने पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये स्वत:ला चांगले सिद्ध केले आहे पण लाल चेंडूच्या क्रिकेटच्या बाबतीत त्याला कमी अनुभव आहे. तर इशान गेल्या एक वर्षापासून टीमसोबत सतत प्रवास करत आहे पण त्याला खेळण्याची फारशी संधी मिळाली नाही. आता केएल राहुलने शतक झळकावल्यानंतर किशनचा लाल चेंडूसाठी कितपत विचार केला जाईल आबाबत याशंकता आहे.आता त्याच्यासाठी कसोटी संघात स्थान मिळवणे कठीण दिसत आहे.

    ऋषभ पंत
    गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ऋषभ पंंतचा कार अपघात झाला होता. तेव्हापासून तो क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे आणि दुखापतींमधून सतत सावरत आहे. आयपीएल २०२४ मध्ये त्याचे क्रिकेटमध्ये पुनरागमन होण्याची शक्यता आहे.
    पंत परतल्यानंतर भारतीय संघाचा पहिला पसंतीचा यष्टिरक्षक बनेल यात शंका नाही. विशेषत: कसोटीत त्याची कामगिरी जबरदस्त राहिली आहे मात्र आल्यानंतर तो परफॉर्म करू शकला नाही तर काही काळानंतर संघ व्यवस्थापन पुन्हा केएल राहुलकडे यष्टिरक्षकाची जबाबदारी सोपवू शकते. राहुल पंतसाठी तगडा स्पर्धा देणारा खेळाडू ठरला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Kishor Koli

    Related Posts

    Jalgaon : महिलांनी क्रीडा क्षेत्रात पुढे यावे मंत्री रक्षाताई खडसे

    March 8, 2026

    India vs England Semi-Final: उपांत्य फेरीत टीम इंडियाचा प्लेइंग 11 निर्णय, बेंचवर बसणार हे चार महत्त्वाचे नाव

    March 5, 2026

    Jalgaon : नैराश्यातून तरुण विद्यार्थ्याची आत्महत्या प्राचार्यांवर गंभीर आरोप

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.