Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्रीडा»पंड्याला ट्रेड करण्यासाठी मुंबईने म्हणे गुजरातला दिले १०० कोटी?
    क्रीडा

    पंड्याला ट्रेड करण्यासाठी मुंबईने म्हणे गुजरातला दिले १०० कोटी?

    Kishor KoliBy Kishor KoliDecember 25, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : प्रतिनिधी

    इंडियन प्रीमियर लीग २०२४ च्या लिलावाआधी मुंबई इंडियन्सने त्यांचा माजी खेळाडू हार्दिक पंड्याला संघात घेतले. त्यासाठी गुजरात टायटन्ससोबत ट्रेड करण्यात आला. या निर्णर्याने अनेकांना धक्का बसला.पाचवेळा आयपीएल जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सला २०२२ मध्ये विजेतेपद मिळवून देणाऱ्या हार्दिकसाठी १५ कोटी रुपये मोजले.याशिवाय मुंबईने अतिरिक्त ट्रान्सफर फीज भरली. त्याची माहिती केवळ आयपीएलच्या गव्हर्निंग समितीला आहे मात्र आता या रकमेचा उलगडा झाला आहे.
    मुंबई इंडियन्सने पंड्याला गुजरात टायटन्सकडून ट्रेड केले. तेव्हा हार्दिकला मिळणारे १५ कोटी रुपये मुंबईच्या पर्समधून वजा झाले. इतकीच रक्कम गुजरातच्या पर्समध्ये जमा झाली. पण पंड्याच्या पगारापेक्षा अधिक रक्कम गुजरात टायटन्सला ट्रान्सफर फीज म्हणून मिळाली. मुंबईने तब्बल १०० कोटी रुपये मोजून हार्दिकला आपल्या ताफ्यात दाखल केल्याचे वृत्त आहे.
    हार्दिक पंड्या गुजरात टायटन्सचा कर्णधार होता. त्याच्या नेतृत्त्वात संघाने २०२२ मध्ये आयपीएलचे जेतेपद पटकावले तर २०२३ मध्ये संघ उपविजेता ठरला. गुजरात टायटन्स आतापर्यंत केवळ दोन आयपीएल स्पर्धा खेळला आहे.दोन्ही हंगामात त्यांनी हार्दिकच्या नेतृत्त्वात अंतिम फेरी गाठली. त्यामुळे हार्दिकला सोडणे गुजरातसाठी अवघड निर्णय होता.
    मुंबई इंडियन्सकडून १०० कोटी रुपये ट्रान्सफर फीज मिळाल्याने गुजरात टायटन्सचे व्हॅल्यूएशन १०० कोटी रुपयांनी वाढणार आहे तर पांड्याला मुंबई इंडियन्सचे नेतृत्त्व करण्याची संधी मिळणार आहे. याच अटीवर तो मुंबईच्या संघात परतला आहे.आयपीएलमध्ये पंड्या सर्वप्रथम मुंबई इंडियन्सकडूनच खेळला.पंड्याचा समावेश असलेल्या मुंबईने चारवेळा आयपीएलचं जेतेपद पटकावले. आयपीएल २०२२ साठी मुंबईने त्याला रिटेन केले नाही. गुजरात टायटन्सने त्याला आपल्या ताफ्यात घेतले.त्याच्याकडे कर्णधारपद देण्यात आले. संघाला पहिल्याच फटक्यात जेतेपद जिंकून देत त्याने आपल्या नेतृत्त्वाची चुणूक दाखवली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Kishor Koli

    Related Posts

    Jalgaon : महिलांनी क्रीडा क्षेत्रात पुढे यावे मंत्री रक्षाताई खडसे

    March 8, 2026

    India vs England Semi-Final: उपांत्य फेरीत टीम इंडियाचा प्लेइंग 11 निर्णय, बेंचवर बसणार हे चार महत्त्वाचे नाव

    March 5, 2026

    Jalgaon : नैराश्यातून तरुण विद्यार्थ्याची आत्महत्या प्राचार्यांवर गंभीर आरोप

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.