Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»आजारपण कर्जाला कंटाळून धानवडच्या शिवाजी पाटलांनी घेतला टोकाचा निर्णय
    क्राईम

    आजारपण कर्जाला कंटाळून धानवडच्या शिवाजी पाटलांनी घेतला टोकाचा निर्णय

    Kishor KoliBy Kishor KoliDecember 19, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी
    आजारपण आणि डोक्यावर कर्जाचा डोंगर झाल्याने जळगाव तालुक्यातील धानवड येथील शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी पहाटे पाच वाजता उघडकीस आली आहे. शिवाजी चिंधा पाटील (५५, रा. धानवड ता.जि. जळगाव) असे मयत झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. आजाराला कंटाळलो डोक्यावर कर्जाचा डोंगर झाल्यामुळे आत्महत्या करत असल्याचे शेतकऱ्याने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे.
    मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील धानवड येथे शिवाजी चिंधा पाटील आपले पत्नी, दोन मुलं आणि नातवंडे यांच्यासह वास्तव्याला आहेत. मंगळवारी पहाटे ५ वाजता त्यांनी राहत्या घराच्या मागच्या खोलीत दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी लिहलेले सुसाईड नोट आढळून आली आहे. चिठ्ठीत आजाराला आणि कर्जाला कंटाळून मी आत्महत्या करत आहे” असे नमूद केले आहे. कर्ज आणि आजारपणामुळे ते गेल्या काही दिवसांपासून ते विवंचनेत होते. अखेर त्यांनी टोकाचा निर्णय घेतला.
    सकाळी कुटुंब उठले असता त्यांना शिवाजी पाटील यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहून शिवाजी पाटील यांच्या पत्नीसह मुलांनी हंबरडा फोडला. नातेवाईकांनी त्यांना खाली उतरून तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले. मयत शिवाजी पाटील यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Kishor Koli

    Related Posts

    Chalisgaon : चाळीसगावात आरपीएफ जवानाच्या घरात धाडसी चोरी

    March 10, 2026

    Chalisgaon : चाळीसगाव तालुक्यातील पोलीस कर्मचाऱ्याने संपविले जीवन

    March 9, 2026

    Amalner : भरधाव दुचाकीची भीषण धडक विटनेर येथील ४८ वर्षीय प्रौढाचा मृत्यू

    March 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.