Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्रीडा»‘आयएसपीएल’ स्पर्धेत अमिताभ यांनी खरेदी केला मुंबईचा संघ
    क्रीडा

    ‘आयएसपीएल’ स्पर्धेत अमिताभ यांनी खरेदी केला मुंबईचा संघ

    Kishor KoliBy Kishor KoliDecember 19, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    दुबई : वृत्तसंस्था
    आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेेनंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांना वेध लागले आहेत ते आयपीएलच्या सतराव्या हंगामाचे. आयपीएल २०२४ साठी दुबईत मिनी ऑक्शन पार पडला.वेस्टइंडिजचा रॉवमेन पॉवेलवर ७.४० कोटींची बोली लागत या लिलावाला सुरुवात झाली. पॉवेलला राजस्थान रॉयलने आपल्या संघात घेतले तर विश्वचषकाच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाला ऐतिहासिक विजय मिळवून देणाऱ्या ट्रेव्हिस हेडवर सनरायझर्स हैदराबादने ६.८० कोटी रुपयांची बोली लावली. हॅरी ब्रुकला ४ कोटी रुपयात दिल्ली कॅपिटल्सने आपल्या संघात घेतले.एकीकडे चांगले खेळाडू आपल्या संघात घेण्यासाठी चढाओढ सुरु असतानाच बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी मुंबईचा संघ विकत घेतला आहे.

    शाहरुख,प्रितीनंतर
    आता अमिताभ बच्चन
    बॉलिवूड आणि क्रिकेटचे नाते तसे जुनेच आहे.आयपीएलच्या दहा फ्रँचाईजीमध्ये काही संघ बॉलिवूड सेलिब्रेटींचे आहेत. यात शाहरुख खान-जुही चावला कोलकाता नाईट रायडर्सचे मालक आहेत तर पंजाब किंग्जची मालकी प्रीति झिंटाकडे आहे. आता या यादीत आणखी एका सेलिब्रेटीचे नाव जोडले गेले आहे. बीग बी अर्थात अमिताभ बच्चन यांनी आपला क्रिकेटचा संघ खरेदी केला आहे.त्यामुळे आता अमिताभ बच्चनही मैदानात आपल्या संघाला चिअर करताना दिसणार आहेत.
    अमिताभ बच्चन यांनी मुंबईचा संघ विकत घेत असल्याची घोषणा आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन केली
    आहे.इंडियन्स स्ट्रेट प्रीमिअर लीगमध्ये अमिताभ बच्चन यांनी मुंबईचा संघ खरेदी केला आहे. आयएसपीएल ही भारताततील पहिली टेनिस बॉल टी टूर्नामेंट आहे.आयएसपीएलचा पहिला हंगाम २ मार्च ते ९ मार्च दरम्यान मुंबईत आयोजित केला जाणार आहे. अमिताभ बच्चन यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर यासंदर्भातला एक फोटो शेअर केला आहे.
    या फोटोसोबत अमिताभ बच्चन यांनी एक कॅप्शनही लिहिलंय, यात त्यांनी म्हटलेय की,आयएसपीएल म्हणजेच स्ट्रीट प्रीमिअर लीगची सुरुवात रोमांचक, साहसाने भरलेली आहे. रस्त्यावर, गल्लीत आणि घरात खेळपट्टी नसताना ज्यांनी आपल्या क्षमतेचे प्रदर्शन केले त्या खेळाडूंसाठी ही लीग चांगली संधी आहे. मुंबई संघाचा मालक म्हणून त्यांच्याबरोबर रहाणे आपल्यासाठी सौभाग्य असल्याचे अमिताभ बच्चन यांनी म्हटले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Kishor Koli

    Related Posts

    Jalgaon : महिलांनी क्रीडा क्षेत्रात पुढे यावे मंत्री रक्षाताई खडसे

    March 8, 2026

    India vs England Semi-Final: उपांत्य फेरीत टीम इंडियाचा प्लेइंग 11 निर्णय, बेंचवर बसणार हे चार महत्त्वाचे नाव

    March 5, 2026

    Jalgaon : नैराश्यातून तरुण विद्यार्थ्याची आत्महत्या प्राचार्यांवर गंभीर आरोप

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.