Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्रीडा»हार्दिक पांड्यानंतर मोहम्मद शमीलाही दिली ऑफर
    क्रीडा

    हार्दिक पांड्यानंतर मोहम्मद शमीलाही दिली ऑफर

    Kishor KoliBy Kishor KoliDecember 7, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : प्रतिनिधी
    इंडियन प्रीमियर लीग २०२४ सुरु होण्यास काहीच महिने शिल्लक असून आता सर्वांच्या नजरा १९ डिसेंबरला होणाऱ्या लिलावाकडे लागल्या आहेत. गुजरात संघाचा कर्णधार राहिलेला हार्दिक पांड्या त्याच्या जुन्या संघ मुंबई इंडियन्समध्ये परतल्यानंतर गुजरात टायटन्सला आणखी एक धक्का बसू शकतो. या दरम्यान एक मोठी माहिती समोर आली आहे. गुजरात टायटन्स संघाचा गोलंदाज मोहम्मद शमीला एका संघाने थेट ट्रेडबाबत बोलणे केले. गुजरात टायटन्सच्या सीओओने एका मुलाखतीत दावा केला की, वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला एका संघाने संपर्क केला होता.
    गुजरात टायटन्सचे सीओओ कर्नल अरविंदर सिंग यांनी एक खळबळजनक खुलासा केला की, एक फ्रँचायझी शमीवर लक्ष ठेवून होती आणि त्यांनी शमीला संघात सामील होण्याची ऑफर दिली होती. गुजरात टायटन्सचे सीओओ म्हणतात, आयपीएलने ट्रेंडिंगसाठी एक प्रणाली तयार केली आहे. तुम्ही थेट खेळाडूशी संपर्क साधू शकत नाही, यामुळे गैरव्यवस्थापन होईल. नियमानुसार ट्रेंडिंग व्हायला हवे’, असे त्यांचे मत आहे. तसेच, ते म्हणाले की जर त्या टीमने आमच्याशी योग्य मार्गाने संपर्क साधला असता तर आम्ही त्या पद्धतीने बोललो असतो आणि आमच्या इच्छा व्यक्त केल्या असत्या, परंतु योग्य पद्धतीचा वापर केला गेला नाही.
    गुजरात टायटन्ससाठी मोहम्मद शमी हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे आणि एकदिवसीय विश्वचषकातील त्याची कामगिरी पाहता त्याला कोणता संघ सोडण्याचा विचारही करणार नाही. जर आपण आयपीएल २०२४ बद्दल बोललो तर १९ डिसेंबर रोजी लिलाव होणार आहे, ज्यामध्ये सुमारे १२०० खेळाडूंनी आपली नावे नोंदवली आहेत. लिलावापूर्वी संघांनी कायम ठेवलेल्या आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली होती, त्यानंतर हार्दिक पांड्याने गुजरात सोडून मुंबईत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, हा करार मुंबई आणि गुजरात संघामध्ये झाला होता, त्यामुळे त्यावर कोणताही वाद झाला नाही. यानंतर गुजरात टायटन्सने युवा खेळाडू शुभमन गिलची कर्णधारपदी नियुक्ती केली आहे.
    गुजरात टायटन्ससाठी संघ म्हणून ही तिसरी आयपीएल असेल. संघाने पहिल्या दोन हंगामात एकदाच विजय मिळवला आहे, तर एका हंगामात उपविजेतेपद पटकावले आहे. याचा अर्थ असा की, शुभमन गिलसमोर आव्हान असेल की तो कर्णधार असताना हार्दिक पांड्याने ज्या पद्धतीने सुरुवात केली होती त्याच पद्धतीने आपल्या संघाला पुढे नेणे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Kishor Koli

    Related Posts

    Jalgaon : महिलांनी क्रीडा क्षेत्रात पुढे यावे मंत्री रक्षाताई खडसे

    March 8, 2026

    India vs England Semi-Final: उपांत्य फेरीत टीम इंडियाचा प्लेइंग 11 निर्णय, बेंचवर बसणार हे चार महत्त्वाचे नाव

    March 5, 2026

    Jalgaon : नैराश्यातून तरुण विद्यार्थ्याची आत्महत्या प्राचार्यांवर गंभीर आरोप

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.