लोहारा धरणातील पाणी चोरी करणाऱ्यांवर धडक कारवाई

0
46

साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर

येथील धरणातील पाणी चोरी करणाऱ्यांवर पाटबंधारे विभाग, वीज महावितरण कंपनी तसेच ग्रामपंचायत यांनी संयुक्तपणे धडक कारवाई केली आहे. धडक कारवाईचे लोहारा परिसरातील नागरिकांनी स्वागत केले आहे.

दैनिक ‘साईमत’ने १८ नोव्हेंबर रोजी ‘लोहारा धरणातील अवैध उपसा त्वरित थांबवावा’ अशा ठळक मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. त्याची गंभीर दखल घेत लघु पाटबंधारे, जलसंपदा विभाग अंतर्गत असलेल्या लोहारा धरणातील अवैध पाणी उपसा करणाऱ्यांवर पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता किशोर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्वप्निल महाजन, वीज महावितरण कंपनीचेे सहाय्यक अभियंता श्री.पाटील तसेच लोहारा ग्रामपंचायतचे सरपंच अक्षयकुमार जैस्वाल, मच्छीमार सोसायटीचे अध्यक्ष मोहन भोई यांच्या माध्यमातून धरणातील पाणी चोरी करणाऱ्यांवर धडक कारवाई राबविण्यात आली. यामध्ये अवैध उपसा सिंचन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मोटारी, पाईप जप्त केल्या आहेत.

संयुक्तपणे राबविलेल्या कार्यवाहीत माजी सरपंच अमृत चौधरी, ग्रामपंचायत सदस्य ईश्‍वर देशमुख, आबा चौधरी, अशोक माळी, ग्रामपंचायत कर्मचारी अर्जुन पाटील, ज्ञानेश्‍वर सरोदे, रतन चव्हाण, वीज महावितरण कंपनीचे अशोक सुरवाडे, अविनाश राठोड, गोपाल व संपूर्ण स्टॉप, सामाजिक कार्यकर्ते सुरेश चौधरी, मधुकर पाटील, रमेश कोळी, दिनकर गीते, ज्ञानेश्‍वर कोळी, मनोज सोनार, सागर कोळी, मयूर मोरे, संजय वाघमोडे, विनोद कोळी, विशाल चौधरी आदींनी मदतकार्य केले. पिण्याचा पाणीसाठा राखीव करणे ही गरज लक्षात घेता कारवाई करणे गरजेची होती, असे सहाय्यक अभियंता किशोर देशमुख यांनी सांगितले.

लोहारा धरणात पाणीसाठा खूपच कमी असल्याने शेतकऱ्यांनी पाण्याचा उपसा करू नये, अशी ताकीद देण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आम्हाला पिण्याचे पाणी राखीव ठेवण्याबाबत सूचनाही मिळाल्या आहेत. जलसंपदा विभाग मदतीसाठी आम्ही ग्रामपंचायत प्रशासन, व वीज महावितरण मंडळ यांनाही मदत करण्याचे आवाहन केले आहे. यापूर्वी गावात ग्रामपंचायतला सांगून दवंडी देऊनही अवैध उपसा सिंचन कमी होत नसल्याने अखेर त्यानुसार ही धडक कारवाई केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here