Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»सोनवद परिसराच्या विकासाला चालना मिळण्यास मदत
    जळगाव

    सोनवद परिसराच्या विकासाला चालना मिळण्यास मदत

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoNovember 21, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, जळगाव : प्रतिनिधी

    धरणगाव-गंगापुरी-पष्टाणे ते सोनवद अशा १० कि.मी.च्या रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे दिलेले आश्‍वासन पूर्ण झाल्याने आनंद होत आहे. त्यामुळे धरणगाव, सोनवद, हनुमंतखेडा, पष्टाणे, धानोरा, अहिरे, झुरखेडा, बाभुळगाव परिसरातील नागरिकांसाठी दळणवळणाच्या दृष्टिकोनातून फायदा होणार आहे. परिणामी सोनवद परिसराच्या विकासाला यामुळे चालना मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे ग्रामस्थ व शेतकऱ्यांसाठी आधारवड ठरणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

    राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी धरणगाव तालुक्यात शासनाच्या बजेट अंतर्गत मार्च २०२३ मध्ये ४ रस्त्यांसाठी २४ कोटी निधी मंजूर केला होता. त्यात धरणगाव-गंगापुरी-पष्टाणे- सोनवद ५ कोटी, चोरगाव-चांदसर-पाळधी १० कोटी, लाडली ते रेल फाटा ६ कोटी, मुसळी फाटा ते बोरखेडा ३ कोटी या रस्त्यांना मंजुरी मिळाली होती. त्यापैकी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते धरणगाव ते सोनवद या १० कि.मी. रस्त्याचे विधिवत पूजा करून लोकार्पण ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या उपस्थितीत झाले.

    यांची होती उपस्थिती

    याप्रसंगी तालुका प्रमुख डी. ओ. पाटील, गजानन पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील, माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, प्रेमराज पाटील, धानोरा सरपंच भगवान महाजन, प्रमोद पाटील, दामू पाटील, धर्मराज पाटील, सतखेडे लकर गजानन पाटील, मुरलीधर अण्णा पाटील, शाखाप्रमुख पुंडलिक पाटील, महेश (बबलू) पाटील, हुकुमचंद पाटील, योगराज पाटील, भाजपाचे निर्दोष पाटील, एस. पी. पाटील, तालुका संघटक रवींद्र चव्हाण, काशिनाथ पाटील, ज्ञानेश्‍वर पाटील, तुकाराम पाटील, अरविंद मानकरी, भोजचे सरपंच विजय पाटील, संदीप पाटील, नाटेश्‍वर पवार, चंदू शेठ भाटिया, भाऊसाहेब पाटील, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह यांच्यासह ग्रामस्थ व परिसरातील सरपंच व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक धानोराचे सरपंच भगवान महाजन, सूत्रसंचालन चंदूशेठ भाटीया तर आभार भाऊसाहेब पाटील यांनी मानले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon:जळगाव शासकीय वसतिगृहात तरुणाचा गळफास घेऊन मृत्यू

    March 17, 2026

    Jalgaon: जळगावात बर्फ व्यवसायाचा बोजा: रेडिमेड आइस्क्रीमने मागणी घसरवली

    March 17, 2026

    MSRTC BUS : महाराष्ट्रातील सर्व सरकारी एसटी बस इलेक्ट्रिक होणार; ‘लालपरी’चा नवा काळ

    March 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.