साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी
भारत सरकार फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्षित लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहचविण्याच्या उद्देशाने केंद्र शासनमार्फत राज्य, केंद्र शासित प्रदेशांच्या सहकार्याने १५ नोव्हेंबर २०२३ ते २६ जानेवारी २०२४ या कालावधीत “विकसित भारत संकल्प यात्रा” मोहिम राबविण्यात येणार आहे. मोहिमेची अंमलबलावणीसाठी जळगाव जिल्ह्याचा पूर्व आढावा व नियोजनाबाबत केंद्र शासनाचे दोन अधिकारी आलेले आहे. याबाबत आढाव्यासह नियोजन बैठकीचे खा.रक्षा खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजन केले होते.
भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्षित लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचावेत या दृष्टीने केंद्र शासनाने राज्य/केंद्र शासित प्रदेशांच्या सहकार्याने एप्रिल-मे २०१८ या कालावधीत ग्रामस्वराज्य अभियान तसेच जून-ऑगस्ट २०१८ या कालावधीत विस्तारीत ग्राम स्वराज अभियान राबविले आहे. अद्यापही ज्या योजनांचे लाभ लक्षित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलेले नाहीत, अशा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याच्या उददेशाने “विकसित भारत संकल्प यात्रा” ही देशव्यापी मोहीम केंद्र शासनाकडून आखण्यात आली आहे. मोहिमसाठी जळगाव जिल्ह्याचा पूर्व आढावा व नियोजनाबाबत केंद्र शासनाचे दोन अधिकारी हे जिल्हा परिषद जळगाव येथे आलेले होते.
यावेळी खा.रक्षा खडसे यांच्यासह जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अंकित, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक आर.एस.लोखंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील, कार्यकारी अभियंता गणेश भोगावळे, केंद्रीय उपसचिव आदित्य भोज गाडीया आदी उपस्थित होते.