LPG Price Hike: एलपीजी गॅस सिलेंडर पुन्हा महागला ; ‘एवढ्या’ रुपयांनी महागला

0
19
LPG Price Hike एलपीजी गॅस सिलेंडर पुन्हा महागला ; ‘एवढ्या’ रुपयांनी महागला -www.saimatlive.com

साईमत न्यूज 

एन दिवाळीच्या तोंडावर नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्याच्या खिशाला महागाईचा चांगलाच फाटक बसला असून व्यासायिक LPG गॅस सिलिंडरच्या किमती वाढल्या आहे. तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्तिर ठेवत व्यासायिक LPG सिलिंडरच्या किमतीत तब्बल १०१.५० रुपयांनी वाढ केली आहे. १०१.५० रुपयांच्या विक्रमी वाढीनंतर आता आपल्या राजधानी दिल्लीत व्यवसायिक LPG सिलिंडरची नूतन किंमत १८३३ रुपये इतकी आहे. मात्र १४.२ किलोच्या घरगुती LPG सिलिंडरच्या किमतीत अद्याप कोणताही बदल झालेला नाही. म्हणजेच LPG सिलिंडर जुन्या किमतीतच मिळणार आहे. मुंबईमध्ये घरगुती गॅस सिलेंडरची किंमत सध्या 902.50 रुपये एवढी आहे.

गेल्या महिन्यात देखील भाव वाढले होते

तेल कंपन्यांनी गेल्या महिन्याच्या पहिल्या तारखेला म्हणजेच १ ऑक्टोबरला व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती २०९ रुपयांनी वाढल्या होत्या. मात्र, सप्टेंबरमध्ये तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती १५७ रुपयांनी कमी केल्या होत्या.

आज देशात आपल्या सर्वांच्या स्वयंपाकघरात वापरल्या जाणार्‍या १४.२ किलो एलपीजीच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. केंद्र सरकारने ऑगस्ट २०२३ मध्ये एलपीजीच्या किमती २०० रुपयांनी कमी केल्या होत्या.घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. नोव्हेंबरमध्ये देखील घरगुती गॅस सिलिंडरच्या दरांत वाढ करण्यात आलेली नाही.

सध्या १४ किलो LPG सिलिंडरची किंमत किती?

ऑगस्ट महिन्यात नरेंद्र मोदी (Narendra Modi) सरकारने सर्वसामान्यांसाठी घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत २०० रुपयांनी कमी केली, तर उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अनुदान २०० रुपयांवरून ४०० रुपयांपर्यंत वाढवले. यानंतरही या लाभार्थ्यांना १०० रुपयांचा अतिरिक्त लाभ देण्यात आला होता. सध्या सामान्य ग्राहकांसाठी १४.२ किलोचा एलपीजी सिलिंडर दिल्लीमध्ये ९०३ रुपये, मुंबईत ९०२.५० रुपयांना उपलब्ध आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here