लोहारातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभेचे ज्येष्ठ महिलांनी केले नेतृत्व

0
50

साईमत, लोहारा, ता पाचोरा : वार्ताहर

येथील ज्येष्ठ नागरिक संघाची साप्ताहिक सभा दर रविवारी घेण्यात येते. रविवारी झालेल्या सभेचे नेतृत्व मात्र ज्येष्ठ महिलांनी आपल्या हाती घेतले. साप्ताहिक सभेला ६० ज्येष्ठ नागरिक महिला आणि ५१ ज्येष्ठ नागरिक पुरुष उपस्थित होते. सभा महिलांनी उत्कृष्ट, शांततेत चालवली. व्यासपीठावर १० महिलांना स्थान देण्यात आले होते.

सभेची सुरुवात पूज्य साने गुरुजी रचित प्रार्थना ‘खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे’ ने झाली. सभेचे सूत्रसंचालन आशा रामचंद्र काळे यांनी केले. त्यांनी ज्येष्ठ नागरिक संघाची गरज आणि महत्त्व विशद केले. कमलाबाई काकडे यांनी विचार प्रकट करून भजन गायले. इंदुबाई जाधव यांनी श्रीकृष्णाची बोधकथा सांगितली. अंजनाबाई जाधव यांनी विचार पुष्प दिले. प्रमिलाबाई पाटील आणि शिंदे ताई यांनी सुरेख आवाजात गीत गायन केले. आशा काळे यांनी विरंगुळा केंद्राची आवश्यकता त्यासाठी ग्रामपंचायतकडे जागेची मागणी केल्याचे व बांधकामासाठी निधीची मागणी मंत्री ना.गिरीश महाजन यांच्याकडे चार महिन्यांपूर्वी निवेदन देऊन केली आहे. तसेच जिल्हाधिकारी आणि जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदन दिल्याचे सांगितले. मात्र अद्याप कोणाकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याचे सांगून आम्ही ज्येष्ठ नागरिक आशावादी असल्याचे सांगितले. सभेची सांगता पसायदानाने झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here