साईमत, लोहारा, ता पाचोरा : वार्ताहर
येथील तुकाराम आनंदा माळी पतसंस्थेचे सभासद भिका कुंभार यांच्या मुलीला किडनीच्या आजाराने त्रस्त केले आहेे. त्यामुळे त्यांना चेअरमन डॉ.सुभाष घोंगडे यांनी पतसंस्थेमार्फत सभासद कल्याण निधीतून दहा हजार रुपयांचा धनादेश देऊन मदतीचा हात पुढे केला आहे. त्यामुळे चेअरमन डॉ.सुभाष घोंगडे यांच्या दातृत्वचे सर्वत्र कौतुक होत आहे.
संस्थेचे सभासद भिका कुंभार हे सर्वसामान्य कुटुंबातील आहे. त्यांची लहान मुलगी पूनम भिका कुंभार हिला किडनीच्या आजाराने त्रस्त केले आहे. त्यामुळे त्यांना आठवड्यातून दोन वेळेस डायलिसिस करावे लागत आहे. यासाठी ते आर्थिक संकटातून जात आहेत. आपला सभासद संकटात असल्याने त्याला आपल्या परीने थोडा फार का होईना हातभार लावावा, या हेतूने संस्थेचे चेअरमन डॉ.सुभाष घोंगडे आणि संचालक मंडळाने चर्चा केली. संस्थेच्या कार्यालयात भिका कुंभार, पूनम कुंभार यांना चेअरमन डॉ.सुभाष घोंगडे यांच्या हस्ते दहा हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. यावेळी संचालक विठ्ठल बनकर, हिरालाल जाधव, ज्ञानेश्वर माळी, मुरलीधर गिते, विजय पालीवाल, महेंद्र शेळके, दीपक पवार, चंद्रकांत पाटील, दिलीप चौधरी, ज्ञानेश्वर राजपूत, मॅनेजर रमेश सरोदे, गजानन भिवसने, सोपान सरोदे आदी उपस्थित होते.
यापूर्वी तु.आ.माळी पतसंस्थेने संस्थेच्या सामाजिक कल्याण निधीतून डॉ.पंडित विद्यालयात विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची टाकी, जिल्हा परिषद कन्या शाळेत पाण्याची टाकी, स्मशानभूमीत पाण्याची टाकी, दत्त मंदिर व राममंदिरात भाविकांना बसण्यासाठी बाकडे(बेंच), लोहारा व परिसरासाठी शवपेटी दिली आहे. संस्था नेहमीच गावासह सभासदांच्या मदतीसाठी तत्पर असल्याचे चेअरमन डॉ.सुभाष घोंगडे यांनी सांगितले.