Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»कौटुंबिक विवंचनेतून तरुणाची गळफास लावून आत्महत्या
    क्राईम

    कौटुंबिक विवंचनेतून तरुणाची गळफास लावून आत्महत्या

    SaimatBy SaimatOctober 23, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत जळगाव प्रतिनिधी

    येथील मेहरूण परिसरातील रेणूका नगर मधील ४२ वर्षीय इसमाने कौटुंबिक विवंचनेतून छताला दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी २३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    मेहरूण परिसरातील रेणुका नगरात संतोष वामन भावसार (वय ४२) राहिवासाला होते. त्यांची पत्नी तीन महिन्यांपासून – तीन मुलांसहित बेपत्ता आहे. तेव्हापासून ते रेणुका नगरात एकटे राहत होते. प्लम्बिंग काम करून ते स्वतःचा उदरनिर्वाह करीत होते. त्यांच्या विवाहित बहिणी रेणुकानगर परिसरातच राहतात. गेल्या काही दिवसांपासून संतोष हे कौटुंबिक तणावात असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. सोमवारी ते सकाळपासून घराच्या बाहेर पडलेच नाही. याबाबत नागरिकांना संशय आला. त्यांनी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास संतोष भावसार यांच्या घरात जाऊन पाहिले असता, ते गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले.

    नागरिकांनी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. आदित्य साळुंखे यांनी त्यांना मयत घोषित केले. याबाबतची माहिती त्यांच्या बहिणींना देण्यात आली. त्यावेळी त्यांनी आक्रोश केला. दरम्यान, घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Bhusawal : भुसावळ तलाठी कार्यालयाचे ४२,५६० रुपयांचे वीज बिल थकीत

    March 14, 2026

    Jalgaon:एमआयडीसीत थकबाकीदारांविरुद्ध जोरदार कारवाई, दोन कंपन्यांना तातडीने सील

    March 14, 2026

    Jalgaon:जळगाव पोलीस ठाण्यातच शिवसेना शिंदे गट-भाजप कार्यकर्त्यांमध्ये पोलीस ठाण्यात हाणामारी

    March 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.