शेतीला सुरळीत वीज पुरवठा करा

0
46

साईमत, जामनेर : प्रतिनिधी

जगाचा पोशिंदा शेतकरी आपल्या कुटुंबासह अहोरात्र काम करत आहे. शेतीला पाण्याची अत्यंत गरज असतांना आणि दुष्काळग्रस्त परिस्थितीचे सावट असतांना, वीज महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे पिके करपुन नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. वीज महावितरण कंपनीने शेतकऱ्यांच्या भावना समजुन घेऊन सहकार्य करावे. अन्यथा जामनेर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन उभारणार असल्याचा इशारा निवेदनातून दिला आहे. त्यामुळे जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने विश्वजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली पहुरला महावितरण कार्यालयाला निवेदन देण्यात आले.

शेतीसाठी ८ तास वीज हा महावितरणाचा निर्यण फक्त कागदावरच दिसुन येत आहे. शेतीसाठी नियोजित ८ तास वीज असतांना वीज महावितरणाचे कर्मचारी नेहमी फॉल्ट शोधण्याचे काम करतात. शेतकऱ्यांशी अरेरावीची भाषा करत वरिष्ठांशी बोला, म्हणुन उडवाउडवीचे उत्तर देतात. सतत कमी दाबाने वीज पुरवठा केला जातो. त्यामुळे वीज पंप जळत आहेत. यासर्व गोष्टींनी शेतकरी हवालदिल झालेला आहे. संकटाच्या काळी शेतकऱ्यांच्या पाठीमागे भरभक्कमपणे उभे राहण्याची वेळ आली आहे.

याप्रसंगी विश्वजित पाटील, दीपक पाटील(रा.काँ. पाळधी गण प्रमुख), सुरेश चव्हाण (गण प्रमुख, लोंढ्री), नंदु इंगळे (ग्रा.पं. सदस्य सोनाळा), जीवन पाटील(ग्रा.पं.सदस्य, पाळधी), अजय राजपूत, मयूर पाटील, अभिजित शेळके, सुनील पाटील, कार्तिक काळे, योगेश सुशिर, मोहन जोशी, जितेंद्र पाटील यांच्यासह असंख्य शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here