Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»प्रा.सी.एस.पाटील यांच्या कथाकथनाने भारावली मुले
    जळगाव

    प्रा.सी.एस.पाटील यांच्या कथाकथनाने भारावली मुले

    SaimatBy SaimatOctober 19, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत जळगाव प्रतिनिधी

    साने गुरुजी हे मुला-फुलांचे कवी होते. लहान मुलांमध्ये ते लहान होऊन मिसळून जात. त्यांच्याशी मनसोक्त गप्पा मारत होते. त्यांना गोष्टी सांगत होते. अशा मातृहृदयी गुरुजींच्या नावाने सुरु असलेली कथामाला गेली अनेक वर्षे अव्याहत सुरु ठेवणाऱ्या कै.सुनिता जगन्नाथ वाणी भगीरथ शाळेला आणि कथामाला संयोजकांना धन्यवाद दिले पाहिजे, असे प्रतिपादन ह.भ.प. प्रा. सी. एस.पाटील यांनी कथामाला उद्घाटनासह प्रथम पुष्प गुंफतांना केले. अध्यक्षस्थानी उपमुख्याध्यापिका प्रिया सफळे होत्या.

    ईशस्तवन, स्वागतगीत आणि साने गुरुजींची ‘खरा तो एकची धर्म’ ही प्रार्थना संगीत शिक्षक राजू क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थिनींनी सादर केल्याने वातावरण निर्मिती छान झाली. प्रा.सी.एस.पाटील यांच्या कथाकथनाने मुले भारावली होती.

    प्रमुख पाहुणे प्रा. पाटील आणि मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन आणि सानेगुरुजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कथामाला समितीच्या सदस्या सुनीता पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करुन देतांना वयाच्या ७० व्यावर्षी एम.ए.तत्त्वज्ञान विषयाची परीक्षा ८६ टक्के गुणांनी उत्तीर्ण झाल्याबद्दल प्रा. सी. एस. पाटील यांचे अभिनंदन केले.

    प्रा.पाटील पुढे म्हणाले की, कथा किंवा गोष्ट ही लहान मोठ्या सर्वांनाच आवडते. पंचतंत्राचे लेखक पंडित विष्णु शर्मा यांनी पशु-पक्षी, प्राण्यांच्या गोष्टींच्या माध्यमातून धर्म, नीती, मूल्यशिक्षण, व्यवहारज्ञान अत्यंत प्रभावीरितीने शिकविले आहे. पंचतंत्रमधील कथा हा कथामालेचा प्रारंभ बिंदू म्हटला तर वावगे ठरु नये, असे सांगून त्यांनी दोन छोट्या कथा अत्यंत प्रभावी रीतीने सादर करुन विद्यार्थ्यांना खिळवून ठेवले.
    अध्यक्षीय भाषणात प्रिया सफळे म्हणाल्या की, चांगला प्रारंभ हे अर्धे यशाचे लक्षण असते. त्या दृष्टीने आपली कथामाला निश्चितच फलदायी होणार, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. प्रास्ताविकात कथामाला प्रमुख अशोक पारधे यांनी कथामालेची परंपरा व उद्देश विशद केला. सूत्रसंचालन आर.डी. कोळी तर अलका पितृभक्त यांनी स्वरचित कविता सादर करून आभार मानले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Bhusawal:साकरीत पोलिसांची धडक कारवाई; अवैध दारू पकडली

    March 22, 2026

    PM Narendra Modi record : पंतप्रधान नरेंद्र मोदींना ऐतिहासिक टप्पा; भारतीय राजकारणातील सर्वाधिक काळ सत्ताप्रमुख

    March 22, 2026

    Bhusawal : विवाहितेवर शारीरिक व मानसिक छळ; माहेरून १ लाख रुपये आणण्यास दबाव, पतीसह ६ जणांविरुद्ध गुन्हा

    March 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.